31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरक्राईमनामाउत्तर प्रदेशमध्ये तरुणाने अमित बनून हिंदू मुलीवर केला बलात्कार

उत्तर प्रदेशमध्ये तरुणाने अमित बनून हिंदू मुलीवर केला बलात्कार

उत्तर प्रदेशमधून लव्ह जिहादचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशमधून लव्ह जिहादचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. कन्नौज जिल्ह्यात एका हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर बलात्कार करून तिला धर्म बदलून लग्न करण्यास भाग पाडल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरिफ उर्फ ​​तनवीर मिर्झा याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नाहरघाटी, मियांगढ येथील रहिवासी आरिफ उर्फ ​​तनवीर मिर्झा याने अमित असल्याचे भासवून एका हिंदू मुलीला नोकरी लावण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, आरिफचे कुटुंबीय तिच्यावर धर्म परिवर्तन करून लग्न करण्यासाठी दबाव टाकत होते. त्यानुसार तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी २ ऑक्टोबर रोजी आरिफ उर्फ ​​तनवीरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आरिफ हा हिंदू विद्यार्थिनींना फसवण्यासाठी बाईकवर भगवे झेंडे लावून फिरत असे असा आरोप करण्यात आला आहे. तसेच आरिफ उर्फ ​​तनवीर मिर्झा याने मुलीवर केवळ बलात्कारच केला नाही, तर तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करण्याचाही प्रयत्न केला.

हे ही वाचा:

मेस्सी म्हणतो हा माझा शेवटचा विश्वचषक

चिथावणीखोर वक्तव्य करणारे जुबेर, प्रतिक सिन्हा नोबेलसाठी नामांकित

बंगालमध्ये दुर्गा विसर्जनात मोठी दुर्घटना,आठ मृत्यू

‘उद्धवराव, लोकांशी तुम्ही बेईमानी केली, २०१९ला तुम्ही गद्दारी केली’

आरिफने तरुणीला रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवले होते. त्यानंतर त्याने रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी हॉटेलमध्ये राहत असल्याचे सांगून हॉटेलमध्ये बोलावले. पीडितेने आरोप केला आहे की, आरिफने तिच्यावर बलात्कार केला आणि तिचा व्हिडिओही बनवला. पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरिफच्या कुटुंबातील सदस्य नूर आलम, शाहनवाज आणि मेहुणी बेबी यांनी तिला धर्मांतर करण्यास भाग पाडले. सध्या पोलिसांनी या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा