दिल्लीतील एका व्यवस्थापन संस्थेत १७ मुलींशी झालेल्या अश्लील वर्तनाची धक्कादायक घटना समोर आली आहे. श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंटमधील विद्यार्थ्यांनी चैतन्यनंद सरस्वती यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संस्थेचे प्रशासक पी. ए. मुरली यांच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वसंत कुंज येथील एका खाजगी संस्थेच्या शाखेच्या संचालकावर १५ हून अधिक विद्यार्थिनींनी तक्रारी दाखल केल्यानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी मंगळवारी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ऑगस्ट रोजी वसंत कुंज उत्तर पोलिस ठाण्यात संस्थेच्या प्रशासकाकडून चैतन्यनंद सरस्वती यांच्याविरुद्ध तक्रार प्राप्त झाली होती, ज्यामध्ये संस्थेत EWS शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत PGDM अभ्यासक्रम घेत असलेल्या महिला विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता.
पोलिसांनी पुढे सांगितले की चौकशीदरम्यान, ३२ विद्यार्थिनींचे जबाब नोंदवण्यात आले, त्यापैकी १७ जणींनी आरोपीने अपशब्द वापरल्याचा, अश्लील व्हॉट्सअप, एसएमएस संदेश पाठवल्याचा आणि चुकीचा स्पर्श केल्याचा आरोप केला. पीडितांनी पुढे आरोप केला आहे की, प्राध्यापक/प्रशासक म्हणून काम करणाऱ्या महिलांनी आरोपींच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले आणि दबाव आणला. त्यानुसार, वसंत कुंज उत्तर पोलीस ठाण्यात कलम (94(R) / 68) / 348 * (R) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान, सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करण्यात आले आणि घटनेच्या ठिकाणी तसेच आरोपीच्या पत्त्यावर अनेक छापे टाकण्यात आले. सध्या आरोपी फरार आहे. चौकशीदरम्यान, संस्थेच्या तळघरात एक व्होल्वो कार पार्क केलेली आढळली. पडताळणी केल्यावर असे आढळून आले की बनावट डिप्लोमॅटिक नंबर प्लेट 39 UN 1 असलेली कार चैतन्यानंद सरस्वती यांनी वापरली होती. त्यानुसार, २५ ऑगस्ट रोजी वसंत कुंज उत्तर पोलिस ठाण्यात कलम ३४५(३)/३१८(४)/३३६(३)/३४०(२) बीएनएस अंतर्गत एफआयआर क्रमांक ३८५/२०२५ हा गुन्हा दाखल करण्यात आला आणि कार जप्त करण्यात आली, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा :
संयुक्त राष्ट्र महासभा: इंडोनेशियाच्या अध्यक्षांकडून भाषणाचा समारोप “ओम शांती, शांती ओम”ने
नेपाळमधील हिंसाचारात माजी पंतप्रधानांच्या पत्नी गंभीर जखमी; पुढील उपचारासाठी भारतात हलवले!
कुशल भारतीयांसाठी जर्मनीची दारे खुली! भारतातील जर्मन राजदूत असे का म्हणाले?
स्वतःच्या लोकांवर बॉम्बस्फोट करण्यापासून वेळ मिळाला की “हे” काम करा!
या घटनेनंतर आरोपीला संस्थेतून काढून टाकण्यात आले आहे. श्री श्री जगद्गुरु शंकराचार्य महासंस्थानम दक्षिणम्नाय श्री शारदा पीठम, श्रृंगेरी यांनी एक निवेदन जारी केले आहे की, “चैतनयानंद सरस्वती, ज्यांना पूर्वी डॉ. पार्थसारथी म्हणून ओळखले जात होते, ते बेकायदेशीर, अयोग्य आणि श्री श्री जगद्गुरु शंकराचार्य महासंस्थानम दक्षिणम्नाय श्री शारदा पीठम यांच्या हिताला बाधक अशा कामांमध्ये गुंतले आहेत. परिणामी, पीठमने त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडले आहेत.







