29 C
Mumbai
Thursday, January 22, 2026
घरक्राईमनामाआंतरराष्ट्रीय तिरंदाजाची उपसंचालक चोरमलेंविरोधात विनयभंगाची तक्रार

आंतरराष्ट्रीय तिरंदाजाची उपसंचालक चोरमलेंविरोधात विनयभंगाची तक्रार

Google News Follow

Related

आशियाई अजिंक्यपद विजेती आणि जागतिक तिरंदाजी स्पर्धेत ब्राँझपदक जिंकणारी तिरंदाज जयलक्ष्मी सारिकोंडाने बालेवाडीतील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल, पुणे येथील क्रीडा व युवक कल्याण विभागाचे उपसंचालक अनिल चोरमले यांच्याविरोधात लैंगिक आणि शाब्दिक विनयभंगाची तक्रार केली आहे. या विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे ही तक्रार केली आहे. जयलक्ष्मी बालेवाडीत मुलांना तिरंदाजीचे प्रशिक्षण देण्याचे काम करते. याआधी ती गडचिरोली येथे क्रीडाधिकारी म्हणून काम करत होती नंतर पुण्यात तिची बदली झाली.

पुण्यात तालुका क्रीडाधिकारी असलेल्या जयलक्ष्मी सारिकोंडाने या तक्रारीत म्हटले आहे की, चोरमले यांच्याविरोधात मी विनयभंगाची तक्रार करते आहे. मी बालेवाडी येथील क्रीडा संकुलात नियुक्त झाल्यापासून यासंदर्भातील त्रास त्यांच्याकडून सहन करते आहे.

सारिकोंडाने या पत्रात ही घटना नमूद केली आहे. त्यात म्हटले आहे की, २१ फेब्रुवारीला मला क्लर्क कविता घाणेकर यांच्याकडून सांगण्यात आले की, अनिल चोरमले यांच्या केबिनमध्ये तातडीने ये. साधारणपणे ६.१० वाजता मला तिथे बोलावण्यात आले. मी ज्या खेळाडूंना मार्गदर्शन करते आहे, त्यांना तिथेच मैदानावर सोडून केबिनमध्ये पोहोचले. मी दरवाजा उघडला आणि आत गेले तेव्हा चोरमले माझ्याकडे पाहात ओरडले की, मी नेहमी त्यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना रिपोर्ट का करत नाही? ते मला वरून खालपर्यंत न्याहाळत होते. माझ्याशी नजर मिळवून ते बोलत नव्हते. या संपूर्ण संवादादरम्यान ते माझ्या छातीवर नजर खिळवून होते. मी नवनाथ फरताडे सरांना नियमितपणे रिपोर्ट करत होते. माझ्या कामाची माहिती त्यांना देत होते. तेसुद्धा तिरंदाजी प्रशिक्षण केंद्राजवळ येऊन चाललेल्या सरावाची माहिती घेत असत. २१ फेब्रुवारीला चोरमले यांनी केबिनमध्ये असलेल्या लोकांसमोरच माझा अपमान केला. ते असेही म्हणाले की, तुम्ही वर्ल्ड चॅम्पियन असाल तर तुमच्या घरी. काही महिन्यांपूर्वी ते असेही म्हणाले होते की, जर सरकारने तुम्हाला नोकरी दिली नसती तर तुम्हाला रस्त्यावर येण्याची वेळ आली असती. चोरमले यांनी मला त्यानंतर केबिनमध्ये संध्याकाळी ७.३० पर्यंत बसवून ठेवले आणि ते माझ्याकडे पाहात राहिले.

तेव्हा आपण यासंदर्भात योग्य कारवाई करावी आणि महिलांना या विभागात काम करण्यास सुरक्षित वाटेल अशी काळजी घ्यावी. सारिकोंडाने केलेल्या या तक्रारीनंतर आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याशी न्यूज डंकाने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही. त्यांनी फोन उचलला नाही. चोरमले यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला पण तेही व्यस्त असल्यामुळे बोलू शकले नाहीत.

हे ही वाचा:

कोर्टाने लिएंडर पेसला कौटुंबिक हिंसाचारात ठरवले दोषी

हिंदुत्वाचा नारा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना स्वा. सावरकरांचा विसर

रशिया – युक्रेन युद्धात युक्रेनची पहिली महिला पायलट ठार

सावरकरच स्वातंत्र्य चळवळीचे प्रणेते

या तक्रारीची दखल घेत महिलांची एक चौकशी समिती स्थापन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. आता या समितीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. यासंदर्भात जयलक्ष्मी सारिकोंडाचे वडील त्रिनाद यांनीही या तक्रारीची दखल घ्यावी अशी मागणी केली आहे.

चोरमले यांच्याविरोधात यापूर्वी एमपीएससीच्या परिक्षेला बसलेल्या मुलाला बनावट क्रीडा प्रमाणपत्र दिल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्यासह दोन जणांना अटकही करण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. कोल्हापूर येथील ही घटना होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा