29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
घरक्राईमनामाजे. पी. नड्डा यांच्या पत्नीची गाडी चोरीला

जे. पी. नड्डा यांच्या पत्नीची गाडी चोरीला

दिल्लीतील गोविंदपुरी परिसरातून गाडी चोरीला

Google News Follow

Related

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या पत्नीची गाडी चोरीला गेल्याची माहिती समोर अली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या पत्नीची आलिशान कार चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सर्व्हिस सेंटरमधून ही गाडी चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे.

दक्षिण पूर्व दिल्लीतील गोविंदपुरी परिसरातून ही कार चोरीला गेली आहे. गाडीचा ड्रायव्हर हा गोविंदपुरी येथील एका सर्व्हिस सेंटरमध्ये कार ठेवून त्याच्या घरी जेवणासाठी गेला होता. जोगिंदर सिंग असे ड्रायव्हरचे नाव असून तो गोविंदपुरी भागात राहतो. १९ मार्च रोजी चोरीची घटना दुपारी ३ ते ४ च्या दरम्यान ही घटना घडली. त्या दिवशी जोगिंदर सिंग हे HP 03 D 0021 या क्रमांकाची पांढऱ्या रंगाची फॉर्च्युनर गाडी पार्क करून जेवणासाठी घरी गेले होते. मात्र, थोड्या वेळाने ते परत आले असता, गाडी जागेवर नव्हती. त्यामुळे गाडी चोरीला गेल्याची बाब लक्षात आली.

कार चोरीला गेल्याचे लक्षात येताच जोगिंदर यांनी थेट पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. त्यांनी नोंदवलेल्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या चोरीच्या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी पथक पाठवून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता गाडी गुरुग्रामच्या दिशेने जाताना दिसली.

हे ही वाचा :

तुरुंगातून केजरीवालांनी दिलेला आदेश चौकशीच्या फेऱ्यात

चांद्रयान ३ची लँडिंग साइट ‘शिवशक्ती’ नावानेच ओळखली जाणार!

बांगलादेशी मुस्लिमांना आधी भारतीय व्हावे लागेल तरच…

केजरीवालांच्या अटके विरोधात इंडी आघाडीचा ‘आक्रोश’!

माहितीनुसार, चोरीला गेलेली गाडी ही भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या पत्नीच्या नावे रजिस्टर्ड आहे. जे. पी. नड्डा मूळचे हिमाचलचे आहेत. चोरीचे हे प्रकरण एका हायप्रोफाईल व्यक्तीशी संबंधित असल्याने पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. पोलिसांची सात पथके या चोरीचा तपास करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
151,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा