32 C
Mumbai
Tuesday, December 16, 2025
घरक्राईमनामादागिने विक्रेत्याने दिली होती मुकेश अंबानींना धमकी

दागिने विक्रेत्याने दिली होती मुकेश अंबानींना धमकी

धमकी देणारा हा व्यक्ती व्यवसायाने दागिना विक्रेता असून त्याचे दक्षिण मुंबईत दुकान आहे

Google News Follow

Related

रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ५६ वर्षी विष्णू विभू भौमिकला पोलिसांनी पकडले आहे. धमकी देणारा हा व्यक्ती व्यवसायाने दागिना विक्रेता असून त्याचे दक्षिण मुंबईत दुकान आहे.

रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये कॉल करताना त्याने आपले नाव अफजल असल्याचे सांगितले होते. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपी मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे की नाही याचीसुद्धा पोलीस चौकशी करत आहेत.

मुंबईतील गिरगाव परिसरात असलेल्या रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात सोमवारी सकाळी १०.४० च्या सुमारास पहिला कॉल करताना या व्यक्तीने केवळ मुकेश अंबानींनाच नव्हे, तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. भौमिक हा दहिसरचा रहिवासी आहे. फोन करून त्याने शिवीगाळ आणि मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. आठ ते नऊ वेळा आरोपीने अंबानींच्या कार्यालयात फोन करून त्यांना धमकावले.

या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलीस सतर्क झाले आणि कलम ५०६ (२) अन्वये फौजदारी धमकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन काही केंद्रीय यंत्रणांनीही यासंदर्भात माहिती घेतली आहे. विष्णु विभू भौमिकला बोरिवली पश्चिम पकडून डीएम मार्ग पोलिस ठाण्यात आणण्यात आले. येथे त्याची याप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. पोलीस आरोपीच्या पूर्वीच्या गुन्हेगारी रेकॉर्ड देखील तपासत आहोत. ते म्हणाले की, धमक्या देताना या व्यक्तीने केवळ मुकेश अंबानींचेच नाव घेतले नाही, तर एकदा कॉलमध्ये धीरूभाई अंबानीचे नावही वापरले होते.

हे ही वाचा:

बस दरीत कोसळली, ६ जवान शहीद

रश्दी यांच्या सॅटॅनिक व्हर्सेससाठी गुगलवर गर्दी

शिवमोग्गामध्ये सावरकर वि. टिपू सुलतान

७५ विधवा महिलांनी फडकावले ७५ राष्ट्रध्वज

दरम्यान, याआधी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या बाहेर एक संशयास्पद कार सापडली होती, ज्यामध्ये वीस जिलेटिनच्या काड्या सापडल्या होत्या.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा