29 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरक्राईमनामाकांजूरमार्गमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

कांजूरमार्गमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Google News Follow

Related

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून समोर येणारी महिला अत्याचाराच्या घटनांची मालिका अजून थांबलेली नाही. कांजूरमार्ग येथे एका ११ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार घडल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. शनिवार, १८ सप्टेंबर रोजी ही घटना समोर आली आहे. कांजुरमार्ग येथील एका उच्चभ्रू इमारतीत ही घटना घडली आहे. इमारतीत वॉचमनचे काम करणाऱ्या इसमानेच चिमुरडीवर अत्याचार केले आहेत.

कांजूरमार्ग पूर्व येथे असलेल्या एका उच्चभ्रू इमारतीत एका अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत वॉचमननेच तिच्यावर लैंगिक अत्याचाहार केला. मुलीने तिच्या पालकांना या घटनेची कल्पना दिल्यानंतर हा सारा प्रकार उघडकीस आला. मुलीच्या पालकांनी या प्रकारची माहिती कळताच तडक स्थानिक पोलिस स्टेशन गाठले. त्या आरोपी विरोधात रीतसर तक्रार नोंदवण्यात आली आहे.

हे ही वाचा:

‘अपमानित’ कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा

‘उद्धवजी, अनैसर्गिक आघाडी केल्याचे आता लक्षात येत असेल ना?’

अवघ्या ५५ मिनिटांत लिव्हर आणि किडनी पोहोचले ५० किमीवर

‘राजकारण संन्यासी’ बाबूल यांचा तृणमूलमध्ये प्रवेश

पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत कारवाई केली आहे. पोलिसांनी १७ सप्टेंबरच्या रात्रीच या नराधमाला अटक केली आहे. अनिल सतीश सिंह असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आयपीसी आणि पॉस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ३५७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेनंतर पुन्हा एकदा मुंबईतील महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मुंबईत महिला असुरक्षित आहेत का? ह्या सर्व घटनांना चाप केव्हा बसणार असा सवाल नागरिक विचारताना दिसत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा