30 C
Mumbai
Sunday, October 13, 2024
घरक्राईमनामाकानपूरमध्ये पुन्हा ट्रेन उलटवण्याचा कट, रुळावर सापडला 'अग्निसुरक्षा सिलेंडर'

कानपूरमध्ये पुन्हा ट्रेन उलटवण्याचा कट, रुळावर सापडला ‘अग्निसुरक्षा सिलेंडर’

लोकोपायलटने आपत्कालीन ब्रेक लावल्याने अपघात टळला

Google News Follow

Related

रेल्वे रुळावरून उलटवण्याच्या कटाच्या घटना अनेक समोर येत आहेत. अशा घटनेच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता पुन्हा एकदा असाच प्रयत्न यूपीच्या कानपूरमध्ये करण्यात आला आहे. या मार्गावरून जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसच्या लोको पायलटला दूरवरून एक संशयास्पद वस्तू रुळावर पडलेली दिसली. लोकोपायलटने वेळीच आपत्कालीन ब्रेक लावला, त्यामुळे ट्रेन काही अंतरावर थांबली. लोकोपायलटने खाली उतरून पाहताच रेल्वे रुळावर सिलिंडर रुळावर पडलेला दिसला.

रिपोर्टनुसार, मुंबईहून लखनौला जाणारी पुष्पक एक्स्प्रेस रविवारी संध्याकाळी ४.१५ वाजता गोविंदपुरी स्टेशनजवळ पोहोचली, तेव्हा पायलटला होल्डिंग लाइनवर ट्रॅकवर आग विझावण्यासाठी वापरण्यात येणारा अग्निसुरक्षा सिलेंडर पडलेला दिसला. पायलटने तात्काळ इमर्जन्सी ब्रेक लावत एक्स्प्रेस थाबवली, मोठा अनर्थ टळला. ट्रेनच्या चालकाने नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली, यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. या प्रकरणी तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा : 

सुनीता विल्यम्स यांचा पृथ्वीवर येण्याचा मार्ग मोकळा; नासाची टीम अंतराळात पोहोचली

इस्रायलने बेरूतमध्ये केलेल्या हल्ल्यात चार जण ठार

लिहून घ्या राहुल गांधी कधीही पंतप्रधान होत नाहीत…

अखेर ६ दिवसानंतर अक्षयचा मृतदेह स्मशानात दफन, पोलिसांच्या बंदोबस्तात अंत्यसंस्कार!

दरम्यान, ट्रेन उलटवण्याच्या कटाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यापूर्वीही रेल्वे रुळावर घरगुती सिलेंडर, लोखंडी पत्रा, लोखंडी विजेचा खांब, सिमेंटचे ब्लॉक, दगड ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणांचा  पोलीस तपास करत आहेत, मात्र अध्याप मुख्य आरोपी सापडलेला नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
182,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा