गोवंडीची ‘किन्नर गुरु’ बाबू खानला अटक, बांगलादेशींना भारतात आणण्यास करत होती मदत!

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिली माहिती 

गोवंडीची ‘किन्नर गुरु’ बाबू खानला अटक, बांगलादेशींना भारतात आणण्यास करत होती मदत!

गोवंडी परिसरातून बांगलादेशी नागरिकांना अवैधपणे भारतात आणणाऱ्या रॅकेटमध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून प्रसिद्ध ‘किन्नर गुरु’ बाबू खान उर्फ ज्योती माँ हिला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. प्राथमिक तपासात समोर आले आहे की तिच्या नियंत्रणाखाली २०० पेक्षा जास्त चेले कार्यरत आहेत. तसेच, मुंबई उपनगरात तिच्या नावावर सुमारे २० घरांची मालमत्ता असल्याचेही उघड झाले आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी एक्सवर पोस्टकरून याबाबत माहिती दिली.

त्याने २०१५ ह्या वर्षात मुंबई महापालिका एम/ पूर्व विभागातून बनावटीने गोवंडी-मुंबई येथे जन्म झाल्याचे जन्म प्रमाणपत्र मिळविल्याचे सोमय्या यांनी सांगितले. स्थानिक नागरिकांनी गोवंडीतील शिवाजीनगर पोलिसांना दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पडताळणी दरम्यान बाबू खानचे कागदपत्रे बोगस असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी सांगितले की, “बाबू खान मुर्शिदाबाद (पश्चिम बंगाल) सीमेवरून बांगलादेशी नागरिकांना अवैधपणे भारतात आणत होती. प्रथम त्यांना कोलकात्यात थांबवून बनावट शाळा दाखले व जन्म दाखले तयार करून मुंबईकडे पाठवले जात होते. गोवंडी परिसरात त्यांना वास्तव्य दिले जात होते.”
हे ही वाचा : 
कतारमधील चर्चेनंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान युद्धबंदीवर सहमत
दोन वर्ष, तीन पुस्तके, हजारोंच्या संख्येने विक्री…
खासदारांचे निवासस्थान असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटमध्ये भीषण आग
गडकिल्ले, देवी- देवतांच्या नावाने असलेल्या बारच्या नावांमध्ये बदल करण्यासाठी आमरण उपोषण

या कारवाईनंतर महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नागपूर आणि मुंबईसह इतर शहरांतील अवैध बांगलादेशी नागरिकांच्या नेटवर्कवर पोलिसांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. सोमय्या यांनी म्हटले, “मुंबई पोलिसांनी ही कारवाई अवैध बांगलादेशी नागरिकांच्या नेटवर्कवर मोठा धक्का बसवणारी आहे. भविष्यात अशा कारवाया तीव्र केल्या जातील.” दरम्यान, पोलिस तपास अद्याप चालू असून पुढील चौकशी आणि अन्य संदिग्धांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.

Exit mobile version