राज्यात गडकिल्ल्यांच्या नावाने, देवी- देवतांच्या नावाने, महापुरुषांच्या नावाने अनेक बिअर बार, डान्स बार सुरू असून याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. अशा नावांमध्ये बदल करावा आणि अशा नावांना परवानगी नसावी यासाठी आवाज उठवण्यात येत आहे. वारंवार मागणी करूनही यश येत नसल्याने बीडमधील ‘माँसाहेब जिजाऊ गोशाळा’चे अध्यक्ष शिवभक्त संग्राम ढोले पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्याच्या नावाने महाराष्ट्रात हजारो दारूचे दुकान बिअर शॉपी बियर बार परमिट रूम आहेत तरी त्या नावामध्ये बदल करावा आणि सर्व गड किल्ल्याचे नाव हिंदू देवताचे नाव जीआरमध्ये सामील करून पुन्हा असे देता येणार नाही असा नवीन जीआर काढून अंमलबजावणी करावी या मागणीसाठी शिवभक्त संग्राम ढोले पाटील यांनी अन्नत्याग आमरण उपोषण सुरू केले आहे. बीडमधील धुमेगाव येथे त्यांनी उपोषणाला सुरुवात करत मागणी लावून धरली आहे.
हेही वाचा..
पाकिस्तानची एक एक इंच जमीन ब्रह्मोसच्या टप्प्यात!
जेकेएलएफसीच्या सेक्शन ऑफिसरला लाच घेताना पकडले
राजीव गांधी यांनी बोईंग करारावर प्रभाव टाकला
प्रेम बिऱ्हाडेचे आरोप खोटे, मॉडर्नच्या प्राचार्य निवेदिता एकबोटेंचे स्पष्टीकरण
अखंड भारताचे दैवत श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण स्वराज्याचे रक्षण ज्या गड किल्ल्यामुळे झाले त्या गड किल्ल्याच्या नावाने हिंदू देवताच्या नावाने आज महाराष्ट्रात हजारो दारूचे दुकान, बिअर बार, परमिट रूम, बिअर शॉपी आहेत. सर्व सकल शिवभक्ताच्या वतीने या अर्जाद्वारे विनंती करतो की या नावामध्ये बदल करावा व पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याचे नाव दारूच्या दुकानाला देता येणार नाही असा नवीन जीआर काढावा व तत्काळ अंमलबजावणी करावी. याआधी शांततेने अनेक उपोषण केले, आंदोलन केले पण कोणतीही कारवाई झाली नाही फक्त पोकळ आश्वासन दिले गेले. आता अन्नत्याग आमरण उपोषण सुरू करत आहोत उपोषणकर्तेच्या जीवाला काही झालं तर याला संपूर्ण जबाबदार प्रशासन राहील याची नोंद घ्यावी, असं पत्र शिवभक्त संग्राम ढोले पाटील यांनी लिहिले आहे.







