दिल्लीतील ब्रह्मपुत्र अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. बीडी मार्गावरील ब्रह्मपुत्र अपार्टमेंट्समधून धुराचे लोट उठताना दिसले. आता ती आग विझवण्यात आली आहे. राजधानीतील बिशंभर दास मार्गावरील ब्रह्मपुत्र अपार्टमेंट्स हे राज्यसभा खासदारांसाठी एक निवासी संकुल आहे. अग्निशमन विभागाला दुपारी १:२० वाजता आगीची माहिती मिळाली आणि सहा अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
कॉम्प्लेक्सच्या वरच्या मजल्यांपैकी एका मजल्यावर आग लागल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. प्रत्यक्षदर्शींनी असा दावा केला की अपार्टमेंटमधील अग्निशामक यंत्र काम करत नव्हते आणि टाकी आणि पाइपलाइनमध्ये पाणी नव्हते. आग दिसल्यानंतर आम्ही अग्निशामक यंत्र तपासले, पण पाणी नव्हते. अग्निशामक यंत्र काम करत नव्हते, अशी माहिती एका रहिवाशाने दिली.
हेही वाचा..
गडकिल्ले, देवी- देवतांच्या नावाने असलेल्या बारच्या नावांमध्ये बदल करण्यासाठी आमरण उपोषण
पाकिस्तानची एक एक इंच जमीन ब्रह्मोसच्या टप्प्यात!
जेकेएलएफसीच्या सेक्शन ऑफिसरला लाच घेताना पकडले
राजीव गांधी यांनी बोईंग करारावर प्रभाव टाकला
दिल्लीत एक मोठी दुर्घटना घडली आहे. ब्रह्मपुत्र अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. आग कशी लागली याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.







