एक विद्यार्थी जो आपल्या शाळकरी वयात यशस्वीपणे एक इन्स्टाग्राम चॅनल चालवतो, तोही विज्ञान या विषयाला वाहिलेला. दहावीची परीक्षा संपेपर्यंत सनातन धर्मावर पुस्तक लिहितो. वयाची 18 वर्षे पूर्ण करेपर्यंत आणखी दोन पुस्तक लिहितो. त्याच्या पुस्तकाची हजारोंच्या संख्येने विक्री होते. ते क्रॉसवर्डच्या शेल्फ मध्ये सुद्धा झळकते. हा करिष्मा केलाय विवान कारुळकर या तरुणाने.
“नवभारताचा” विवान कारुळकर हा एक किशोरवयीन तेजस्वी तरुण आहे, ज्याने केवळ १५व्या वर्षी NEOs (Near Earth Objects) वर इन-प्रिन्सिपल पेटंट मिळवले, आणि तो जगातील सर्वात तरुण पेटंटधारकांपैकी एक बनला.

१६व्या वर्षी त्याने “द सनातन धर्म: ट्रू सोर्स ऑफ ऑल सायन्स” हे आपले पहिले पुस्तक लिहिले, ज्यात त्याने ४६ प्रकरणांद्वारे पश्चिमी विज्ञानाच्या सर्व शोधांना वेदांतील संदर्भांनी आव्हान दिले. त्याचा दावा आहे की आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान हे वेदांमधील ज्ञानाची नक्कल आहे. हे पुस्तक श्रीरामजन्मभूमी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात, श्री चंपतरायजी (मंदिर ट्रस्टचे महासचिव) यांच्या हस्ते गर्भगृहात रामलल्लांच्या चरणांशी ठेवण्यात आले.
१७व्या वर्षी त्याने “द सनातन धर्म: ट्रू सोर्स ऑफ ऑल टेक्नॉलॉजी” हे दुसरे पुस्तक लिहिले. १५ नोव्हेंबर २०२४ रोजी या पुस्तकाचे प्रकाशन परमपूज्य सरसंघचालक श्री मोहनजी भागवत, ISRO चे अध्यक्ष श्री एस. सोमनाथ, आणि नोबेल पुरस्कार विजेते श्री कैलाश सत्यार्थी यांच्या हस्ते भारतीय शिक्षण मंडळ, दिल्ली येथे झाले.

हे ही वाचा:
कर्नाटक काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलच्या द्वेषाचे टोक गाठले!
सेबीकडून स्कॅम, बनावट अॅप्सपासून सावध राहण्याचा सल्ला
समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात ३ ठार
रियर अॅडमिरल शांतनू झा यांनी नौदल क्षेत्राची स्वीकारली कमान
१८व्या वर्षी, एलन मस्क यांच्या प्रेरणेने विवानने आपले तिसरे पुस्तक “Elon Musk: The Man Who Bends Reality” लिहिले, जे त्याने २८ जून २०२५ रोजी एलन मस्क यांच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रकाशित केले.

*दुसऱ्या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, तर गुजराती आवृत्तीचे प्रकाशन केंद्रीय जलशक्ती मंत्री आणि भाजप गुजरात प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांच्या हस्ते झाले.
विवानला वर्ल्ड रेकॉर्ड्स युनिव्हर्सिटी तर्फे रेकॉर्ड ब्रेकिंगमध्ये सन्माननीय डॉक्टरेट (Honoris Causa) बहाल करण्यात आली आहे, कारण तो सनातन धर्मावर पुस्तक लिहिणारा सर्वात तरुण लेखक आहे.

त्याचा युट्यूबवर @VivaansProudcast या नावाचा पॉडकास्ट आहे, ज्यात तो सनातन धर्म व विज्ञान याविषयी आपल्या अभ्यासाचे विचार मांडतो. सिद्धार्थ कन्नन यांच्या पॉडकास्टवर विवानने आपले हे विचार प्रकटपणे मांडले आहेत. फ्री प्रेस जर्नलच्या पॉडकास्टमध्येही विवानची सविस्तर मुलाखत झाली आहे आणि लोकांनी त्याला पसंतीची पोचपावती दिली आहे. सीएनएननेही विवानच्या या प्रयत्नांची योग्य दखल घेतली आहे. मुकेश खन्ना यांनीही विवानशी संवाद साधून त्याच्याकडून विज्ञान आणि आध्यात्म याविषयी जाणून घेतले.
त्याचे Sanatanitatva नावाचे इन्स्टाग्राम पेज आहे, ज्याला १ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
सन्मान व गौरव:
• विवानला संयुक्त राष्ट्रसंघात विशेष निमंत्रण मिळाले होते. त्याने तेथे आपले पुस्तक सादर केले आणि त्यातील संकल्पना UN सदस्यांना समजावून सांगितल्या. पुस्तकाचे Security Council Hall मध्ये श्री गौतम दमरी (UN मधील ३८ वर्षे सेवेत असलेले ज्येष्ठ मुत्सद्दी) यांच्या हस्ते पुन्हा प्रकाशन करण्यात आले.
• लंडनच्या रॉयल फॅमिलीने विवानला प्रेस्टीजियस बॅज व रॉयल कॉइन बहाल केले आणि त्याला रॉयल फॅमिलीचा सन्माननीय सदस्य घोषित केले.
• UK चे पंतप्रधान श्री किअर स्टार्मर यांनी एका रॅलीत विवानच्या पुस्तकाचा उल्लेख केला आणि स्वामिनारायण मंदिरात दर्शनासाठी गेले. त्यांनी विवानला 10 Downing Street येथे आमंत्रित केले.
• UK संसदेमधील कॅबिनेट मंत्री श्री गेरेथ थॉमस यांनी त्याला हाऊस ऑफ कॉमन्सचा मोमेंटो आणि बॅज प्रदान केला – विवान हे मिळवणारा सर्वात तरुण भारतीय आहे.
• लंडनच्या हॅरो येथील महापौर श्री सलीम चौधरी व उपमहापौर अंजना पटेल यांनी त्यांच्या कार्यालयात विवानचा सत्कार केला.
• स्विस संसद, लंडन संसद, बॉस्टन युनिव्हर्सिटी, लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क (USA), आयर्लंड, नेपाळ, श्रीलंका, आणि वर्ल्ड कम्युनिकेशन फोरम (डावोस, स्वित्झर्लंड) येथे विवानचे पुस्तक स्थान प्राप्त करणारे एकमेव सनातन धर्मावरचे पुस्तक आहे.
• भारतीय लष्कराने विज्ञान व साहित्य क्षेत्रातील विवानच्या भरीव योगदानाची दखल घेतली. लेफ्टनंट जनरल श्री धीरज सेठ (AVSM, GOC-in-C, साउथ वेस्टर्न कमांड) यांनी त्याला Citation of Plaque व Medallion – Medal of Appreciation बहाल केले – हे मिळवणारा तो सर्वात तरुण भारतीय आहे.
• भाजप मुख्यालयातील राष्ट्रीय ग्रंथालयात विवानचे पुस्तक पंतप्रधानांच्या पुस्तकाजवळ ठेवण्यात आले – अशा प्रकारे तो त्या ग्रंथालयात स्थान मिळवणारा सर्वात तरुण लेखक ठरला.
• परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर व पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार श्री संजीव सान्याल यांनी विवानच्या कार्याची प्रशंसा केली आहे.
• गुरुदेव श्री श्री रविशंकर, स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज, चिन्ना जियार स्वामी, जैन तेरापंथ संप्रदायाचे अकरावे आचार्य – आचार्य महाश्रमणजी, आणि श्री नयपद्मसागरजी महाराज साहेब यांनी विवानला आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या.
• पुस्तकाचे पुनर्प्रकाशन माजी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, राज्यपाल श्री रमेश बैंस, केंद्रीय मंत्री श्री पीयूष गोयल, तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचे CEO व MD श्री आशीष चौहान यांच्या हस्ते करण्यात आले.
• LIC चे अध्यक्ष व CEO श्री सिद्धार्थ मोहंती, LIC हाउसिंग फायनान्सचे MD व CEO श्री त्रिभुवन अधिकारी, आणि DMart चे संस्थापक श्री राधाकिशन दमाणी यांनीही विवानच्या कार्याची प्रशंसा केली आहे.
• देशभरातील अनेक मंत्री, वरिष्ठ IAS, IRS, व IPS अधिकारी विवानच्या बालवयातील असामान्य यशांनी प्रभावित झाले असून त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
विवान हे शीतल कारुळकर व प्रशांत कारुळकर यांचे सुपुत्र आहेत, जे सुप्रसिद्ध उद्योजक व समाजसेवक आहेत. विवान संघपरिवाराशी संबंधित कारुळकर कुटुंबाची चौथी पिढी असून राष्ट्रनिर्माणातील योगदानासाठी देश-विदेशात अनेकवेळा गौरवले गेले आहे.
विविध क्षेत्रांतील आणि समुदायांतील लोकांनी विवानच्या कार्याची स्तुती करत त्याला आशीर्वाद दिले आहेत आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.







