28.9 C
Mumbai
Monday, November 9, 2026
घरक्राईमनामाजोगेश्वरीच्या मेघवाडीत 'लव्ह जिहाद'मधून तरुणीची फसवणूक

जोगेश्वरीच्या मेघवाडीत ‘लव्ह जिहाद’मधून तरुणीची फसवणूक

फैज मुहम्मद खान या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

Google News Follow

लग्नाचे आश्वासन देऊन तरुणीशी जवळीक साधल्यानंतर तिचे धर्मांतर घडवून आणल्याचा आरोप करत एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मेघवाडी पोलिसांनी फैज मुहम्मद खान या तरुणाविरुद्ध महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६ च्या कलम ९(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचा धर्म बदलण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आपल्या २२ वर्षीय मुलीसह पूर्वी जोगेश्वरी परिसरात राहत होती. काही वर्षांपूर्वी मुलीची फैज खान याच्याशी ओळख झाली होती. २०२२ मध्ये मुलगी फैजशी वारंवार मोबाइलवर बोलत असल्याचे तिच्या वडिलांच्या लक्षात आले होते. त्यावेळी त्यांनी मुलीला फैजशी संपर्क ठेवू नये, असे समजावले होते. मात्र, लांचे निधन झाल्यानंतर फैजने पुन्हा तिच्याशी जवळीक वाढवली. तो तिला वारंवार भेटण्यासाठी बोलावत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

फैजने मुलीला लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी जवळीक साधली. तसेच तिच्या व्यवसायासाठी मदत करण्याचे आमिष दाखवले. याशिवाय, स्वतःचा धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकारल्यास तिच्याशी लग्न करेन, असे सांगितल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

मुंबईत २५ नोव्हेंबरपर्यंत रॉकेट फटाके फोडण्यास बंदी

डॉलरच्या तुलनेत रुपया २५ पैशांनी वधारला

किवी आले अंगावर तर टीम इंडिया घेणार शिंगावर

मणिपूरमध्ये २०२७ ची जनगणना तूर्तास स्थगित

दरम्यान, मे २०२६ मध्ये तक्रारदार महिला आणि तिची मुलगी जोगेश्वरी येथून विरार परिसरात राहायला गेले होते. १८ ऑक्टोबर रोजी मुलगी लग्नाची नोंदणी करण्याचे काम असल्याचे सांगून सकाळी आठच्या सुमारास घरातून बाहेर पडली. दुपारी आईने फोन केला असता, ती कामात असल्याचे तिने सांगितले. मात्र, ती घरी परतली नाही आणि तिचा मोबाइलही बंद असल्याने आईने मुलीला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत विरार पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यानंतर २० ऑक्टोबर रोजी मुलीने आईला मोबाइलवरून फैज खानसोबत बांद्रा येथील न्यायालयात विवाह नोंदणी केल्याच्या प्रमाणपत्राचा फोटो पाठवला. पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यानंतर मुलीने स्वेच्छेने फैजसोबत विवाह नोंदणी केल्याचे सांगितले. तसेच विवाह नोंदणीचे प्रमाणपत्रही सादर केले. या प्रमाणपत्रावर तिचे नाव ‘आयेशा’ असे नमूद असल्याचे आईच्या निदर्शनास आले.

त्यानंतर २४ ऑक्टोबर रोजी फैज खान याने मुलीच्या भावाच्या मोबाइलवर दोघांच्या लग्नाची छापील पत्रिका पाठवली. या पत्रिकेत फैज मुहम्मद आणि ‘आयेशा’ यांच्या विवाहाचा उल्लेख होता. तसेच ६ नोव्हेंबर रोजी जोगेश्वरी परिसरातील मीना नगर येथे विवाह होणार असल्याचे नमूद होते.

या सर्व प्रकारावरून फैज खान याने लग्नाचे आमिष दाखवून मुलीचे धर्मांतर घडवून आणल्याचा आरोप आईने तक्रारीत केला आहे. त्यानुसार मेघवाडी पोलिसांनी ७ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक इंद्रजित नेमाणे यांच्याकडे तपास सोपवण्यात आला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा