27 C
Mumbai
Monday, March 2, 2026
घरक्राईमनामायूपीमध्ये लव्ह जिहाद, आरोपी मोहम्मद आझम झैदीला अटक !

यूपीमध्ये लव्ह जिहाद, आरोपी मोहम्मद आझम झैदीला अटक !

बाराबंकी पोलिसांची कारवाई

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले आहे. आरोपी मोहम्मद आझम झैदीने हिंदू असल्याचे भासवून तरुणीला फसवले आणि तिच्यासोबत लग्न केले. मात्र, आरोपी हिंदू नसल्याचे समोर येताच त्याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पिडीत महिलेले तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी आरोपी मोहम्मद विरुद्ध गुन्हा दाखल करून १५ सप्टेंबर रोजी आरोपीला अटक केली आहे.

बाराबंकी सहाय्यक पोलीस अधीक्षक (एएसपी-दक्षिण) अखिलेश नारायण सिंह यांनी सांगितले की, महिलेच्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी मोहम्मद आझम झैदीने हिंदू असल्याची ओळख देवून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून २०१६ साली लग्न केले. मात्र, लग्नानंतर आरोपी मोहम्मद हा हिंदू नसल्याचे समजले,  त्याबाबत तिने विचारणा केली असता वाद निर्माण होवू लागला. पिडीत महिलेला आरोपीकडून एक मुलगीही आहे.

आरोपीचा खरा चेहरा समोर येताच त्याने तिला मारहाण करत, अत्याचार सुरु केले. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली. अखेर सततच्या अत्याचारला कंटाळून पिडीत महिलेने आरोपी मोहम्मद विरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे आरोपी आरोपी मोहम्मद आझम झैदी विरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला पकडून तुरुंगात टाकण्यात आले आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

हे ही वाचा : 

उद्योगपतीला वाचविण्यासाठी तीन आयपीएस अधिकारी महिलेला छळत होते!

खासदार गोखालेंकडून पुन्हा खोटी माहिती प्रसारित

चक्रीवादळाने पीडित व्हिएतनाम, लाओस, म्यानमारच्या मदतीसाठी भारताचे ‘ऑपरेशन सद्भाव’!

केजरीवाल यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा ही नौटंकी !

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
296,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा