30 C
Mumbai
Wednesday, May 29, 2024
घरक्राईमनामामीरारोडमध्ये लव्ह जिहाद; बिर्याणीमधून गुंगीचे औषध देऊन बलात्कार, धर्म बदलण्याची सक्ती!

मीरारोडमध्ये लव्ह जिहाद; बिर्याणीमधून गुंगीचे औषध देऊन बलात्कार, धर्म बदलण्याची सक्ती!

मुस्लिम कुटुंबाकडून पीडित तरुणीला मारहाण, प्रभू रामाला शिवीगाळ

Google News Follow

Related

मुंबईमधील मीरारोड येथील शांतीनगर येथे लव्ह जिहादचे प्रकरण घडले आहे.एका २६ वर्षीय तरुणीला बिर्याणी मधून गुंगीचे औषध घालून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.तसेच या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ शूट करून मुस्लिम धर्म स्वीकार नाहीतर हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करेन अशी धमकी एका मुस्लिम युवकाने दिली आहे.यासह मुस्लिम युवकाच्या कुटुंबियांकडून पीडित तरुणीला मारहाण करून प्रभू रामाला शिवीगाळ करण्यात आली आहे.

पीडित तरुणी मीरारोड मधील शांतीनगर येथील रहिवासी आहे.२०२३ च्या गणपतीच्या आगमनावेळी ओळख झालेल्या आरोपी मोहसीन शेख या मुस्लिम तरुणाने बिर्याणी खाऊ घालून बळजबरीने अत्याचार केला आणि या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ शूट करून वारंवार मुस्लिम धर्म स्वीकारण्याची धमकी दिली, असा आरोप पीडित तरुणीने केला आहे.यासंदर्भात नयानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पीडित तरुणीने तक्रारीत म्हटल्यानुसार, सोसायटीमध्ये गणपतीच्या आगमनावेळी कल्याणहुन सावंतवाडी नावाचा ढोल तशा पथक आणण्यात आला होता.यामध्ये आरोपी मोहसीन शेख याच्याशी ओळख झाली.यानंतर एकमेकांना नंबर दिले.यानंतर त्याने माझ्याशी बोलताना मला प्रपोज केला.यावर मी त्याला म्हणाले की, आपण फक्त मित्र राहू.यांनतर त्याने दोन-तीन वेळा असा प्रयत्न केला.मात्र, मी त्याला नकार दिला.दरम्यान,०५/१०/२०२३ रोजी माजी आई आणि भाऊ बेंगळुरूला गेले होते.माझे वडील पेशाने डॉक्टर असल्याने ते देखील त्यांच्या विरार येथील क्लीनिक मध्ये गेले होते.

याबाबत आरोपी मोहसीन शेखला माहिती मिळाली आणि तो दुसऱ्याचा दिवशी घरी आला.सोबत त्याने माझ्यासाठी बिर्याणी आणली होती.मैत्री खातर मी त्याच्यावर विश्वास ठेवून बिर्याणी खाल्ली.बिर्याणी खाताच काही वेळाने मला चक्कर येऊ लागली आणि मी कधी झोपले मला कळलेच नाही.सुमारे ३-४ तासानंतर मला जाग आली.त्यावेळी माझ्या अंगावर अंगावर एकही कपडा न्हवता आणि माझा प्रायव्हेट पार्ट, छाती आणि संपूर्ण शरीरास वेदना होत होत्या.त्यावेळी आरोपी मोहसीनला याबाबत विचारले असता त्याने म्हटले, ‘ सॉरी जो हो गया, सो हो गया’, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुझ्यासोबत लग्न करेन, असे आश्वासन देऊन तो निघून गेला.

पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, मी झालेल्या प्रकारास व बदनामीस घाबरून सदरची गोष्ट कोणाला सांगितली नाही.या घटनेच्या एक दिवसानंतर मोहसीन आपल्या मित्रासह परत घरी आला आणि मला आमच्या घराच्या किचन खोलीत नेवून आदल्या दिवशी जो काही प्रसंग घडला तो त्याने सांगितला आणि त्याने बळजबरीने केलेल्या शारीरिक संबंधांचे फोटो आणि व्हिडिओ दाखवले.त्यानंतर मी जसे सांगेन तसे कर नाहीतर हा व्हिडिओ सर्वत्र फॉरवर्ड करेन, अशी धमकी आरोपी मोहसिनने दिली.धमकीच्या आधारे वारंवार माझे लैंगिक शोषण केले गेले.

हे ही वाचा:

६०२ कोटी रुपयांच्या ड्रग्जसह १४ पाकिस्तानी तस्करांना अटक!

औरंगजेब सांगा कुणाचा ?

गुजरात-राजस्थानमध्ये चार ड्रग मॅन्युफॅक्चरिंग लॅबचा पर्दाफाश!

मला संधी दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे धन्यवाद!

यानंतर आरोपी मोहसीनने मला लॉजवर, इतर ठिकाणी बोलवून माझा वापर केला.मी तुझ्याशी लग्न करेन परंतु तुला मुस्लिम धर्म स्वीकारावा लागेल अशी अट मोहसीनने घातली. मी यावर नकार दिल्यास मला शिवीगाळ करत मारहाण करत असे.तो मला वारंवार सांगायचा की, तू मुस्लिम धर्माचा स्वीकार कर, हिंदू लोक काफिर असतात, मुस्लिम धर्म स्वीकारल्यास तुला जन्नत मिळेल, असे सांगत असे.

दरम्यान, या कालावधीत मी गरोदर राहिले आणि मोहसीनला याची माहिती देताच त्याने मला कोणत्या तरी गोळ्या आणून दिल्या.यानंतर माझी पाळी पुन्हा सुरु झाली.या नंतर त्याने मला हाजीअली दर्ग्याला घेऊन गेला, मला बुरखा घालण्यास दिला परंतु मी तो जाळून टाकला.मला गळ्यात घालण्यासाठी ताईत दिली ती सुद्धा मी फेकून दिली.तसेच तो मला पिण्यासाठी कोणते तरी पाणी देत होता.

धमकीच्या आधारे माझ्याकडून सोन्याची चैन, चांदी ब्रेसलेट, रोख रक्कम असे एकूण २,७९,००० रुपये घेतले.हा प्रकार वारंवार होत असल्याने मी पोलीस ठाणे गाठायचे ठरवले.परंतु, मोहसिनने माफी मागून मला शांत केले.त्यानंतर तो गावी गेला आणि पुन्हा मार्च २०२४ परत आला.गावावरून परत आल्यानंतर पुन्हा तेच करू लागला.याबाबत आरोपी मोहसिनच्या कुटुंबियांना सर्व सांगितले.यावर त्याच्या वडिलांनी तुमचे तुम्ही बघा आमच्याकडे येऊ नका असे मला सांगितले.

पीडित तरुणीने पुढे सांगितले की, यानंतर मला मोहसीन आणि त्याचा भाऊ जाफर शेख कल्याण फायर ब्रिगेड जवळ भेटले.यानंतर त्याचा भाऊ निघू गेला आणि मला मोहसिनाने मला एका सुनसान जागी नेले.त्या ठिकाणी त्याचे नातेवाईक काका इम्रान बागवान, भाऊ जाफर शेख, भाऊ मोबीन शेख, जिजा अशफाक शेख हे आले आणि मला त्यांनी छातीवर, पोटावर लाथ मारण्यास सुरुवात केली.यानंतर मी तेथून मोहसीन यांच्या घरी म्हणजेच, चिखले बाग बेबीताई चाळ, कल्याण(पश्चिम) येथे जाऊन मोहसीनची आई शहनाज यांना सर्व गोष्ट सांगितली.यावर त्याच्या आईने मला सांगितले की , मुस्लिम धर्म स्वीकारल्यानानंतरच आम्ही सून म्हणून तुझा स्वीकार करू.

यानंतर त्याच्या घरातील चारही लोक तेथे आले आणि तुला काय करायचे आहे ते कर अशी धमकी मला दिली.त्यानंतर मी ११२ नंबरवर कॉल केला आणि याबाबत पोलिसांना माहिती दिली.पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मी सर्व लोकांवर महात्मा फुले पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार(२५/४/२०२४ ) दिली.तसेच मोहसिनच्या परिसरात प्रभू राम यांचा भंडारा तेव्हा माझासमोरच प्रभू रामांना शिवीगाळ केली आणि ‘हिंदू लोक आम्हाला जगू देत नाहीत’ अशी म्हणाली.दरम्यान, मुख्य आरोपी मोहसीन मेहबूब शेख, इम्रान बागवान, जाफर शेख, मोबीन शेख, अशफाक शेख, शहनाज शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
157,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा