30.6 C
Mumbai
Sunday, October 25, 2026
घरक्राईमनामागोव्यातील अग्निकांड प्रकरणी फरार मालक लुथरा बंधूना थायलंडमध्ये अटक

गोव्यातील अग्निकांड प्रकरणी फरार मालक लुथरा बंधूना थायलंडमध्ये अटक

फुकेतला गेले होते पळून

Google News Follow

गोव्यातील बर्च बाय रोमिओ लेन या क्लबमध्ये शनिवारी झालेल्या भीषण आगीमध्ये २५ जणांचा मृत्यू झाला. सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या क्लबचे मालक असलेले भाऊ सौरभ आणि गौरव लुथरा हे फरार होते मात्र त्यांना थायलंडमधील फुकेतमध्ये ताब्यात घेण्यात आले आहेत.

आग लागल्यानंतर केवळ पाच तासांत त्यांनी दिल्लीहून इंडिगोच्या फ्लाइटने थायलंडला पळ काढला होता. यानंतर त्यांच्या विरोधात लुक-आउट सर्क्युलर आणि इंटरपोल ब्लू नोटिस जारी करण्यात आली. सूत्रांनुसार, गोवा पोलिसांची एक टीम त्यांना ताब्यात घेण्यासाठी लवकरच थायलंडला जाणार आहे.

त्यांचा इंडिगो फ्लाइटने पलायन करणे संशयास्पद वाटले कारण त्या दिवशी संपूर्ण देशात इंडिगोच्या उड्डाणांमध्ये मोठी विस्कळीतता होती. पोलिसांनी तपासात उघड केले की ७ डिसेंबर रोजी रात्री १.१७ वाजता त्यांनी थायलंडचे तिकीट बुक केले.  त्याच वेळी गोव्यात अग्निशमन दल आणि पोलीस कर्मचारी त्यांच्या नाइटक्लबमधील भीषण आग आटोक्यात आणण्याचा आणि लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते.

लुथरा भावांनी भारतात परतण्यास नकार दिला होता. अटकेची भीती असल्याने त्यांनी दिल्लीतील रोहिणी न्यायालयात  जामिनासाठी अर्ज केला. त्यांनी न्यायालयाला सांगितले की ते ‘बर्च बाय रोमिओ लेन’च्या दैनंदिन कामकाजात सहभागी नव्हते आणि अधिकाऱ्यांच्या सूडबुद्धीचा ते बळी ठरत आहेत. त्यांनी हेही सांगितले की थायलंडचा त्यांचा दौरा ‘पलायन’ नसून ‘आधीपासून ठरलेली व्यावसायिक भेट’ होती.

एफआयआरमध्ये धक्कादायक बाबी

गोवा पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआर नुसार, क्लबमध्ये अग्निशमन यंत्रणा, अलार्म, फायर सप्रेशन सिस्टीम, फायर ऑडिट यापैकी कुठलीही यंत्रणा नव्हती. हे सर्व मूलभूत अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन होते.

तसेच, पोलिसांचे म्हणणे आहे की क्लबचे मालक, मॅनेजर, पार्टनर्स, कार्यक्रम आयोजक आणि वरिष्ठ कर्मचारी यांनी योग्य काळजी न घेता आणि गंभीर अपघात होऊ शकतो हे माहीत असूनही क्लबमध्ये धोकादायक आगीचा खेळ सादर केला. एफआयआर मध्ये नमूद आहे की क्लबमध्ये डेकवर आणि ग्राउंड फ्लोअरवर आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग नव्हते. त्यामुळे अनेक पाहुणे आगीच्या भक्ष्यस्थानी अडकले.

हे ही वाचा:

मुंबई प्रेस क्लबच्या सभेत खडाजंगी, सभा रद्द

जाणून घ्या २१ जूनच का आंतरराष्ट्रीय योग दिन?

पोटदुखीपासून खोकल्यापर्यंत ‘अजवाइन’ वरदान

वाहन कर्ज विभागाचे एयूएम दरवर्षी १७ टक्क्यांच्या दराने वाढणार

पूर्ण राज्य यंत्रणा सक्रिय

लुथरा भावांना पकडण्यासाठी मोहीम तीव्र करण्यात आली होती. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांना लवकर अटक करण्याचे आश्वासन दिले होते आणि किनारपट्टीवरील इतर क्लबना सुरक्षा नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई होईल असा इशाराही दिला.

लुथरा भावांचे दुसरा एक क्लब, गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर असून त्याचे बेकायदेशीर बांधकाम आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मुख्यमंत्री सावंत यांच्या आदेशावरून पाडण्यात आले.

एक सहमालक अटकेत

मंगळवारी ‘बर्च बाय रोमिओ लेन’चे सहमालक अजय गुप्ता यांना दिल्लीमध्ये ताब्यात घेण्यात आले. मात्र, त्यांनी इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना सांगितले की ते फक्त ‘स्लीपिंग पार्टनर’ होते आणि क्लबमधील सुरक्षा त्रुटींबद्दल त्यांना काहीही माहिती नव्हती.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा