26 C
Mumbai
Friday, February 6, 2026
घरक्राईमनामामोठा दहशतवादी कट उधळला; सात जणांच्या अटकेसह २,९०० किलो स्फोटके जप्त

मोठा दहशतवादी कट उधळला; सात जणांच्या अटकेसह २,९०० किलो स्फोटके जप्त

फरिदाबादमध्ये कारवाई

Google News Follow

Related

हरियाणाच्या फरिदाबाद येथे ३०० किलो स्फोटके, AK-47 आणि दारूगोळा सापडल्यानंतर काही वेळातच फरिदाबाद येथून आणखी २,९०० किलो इम्प्रोव्हायज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइसेस (आयईडी) बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईनंतर खळबळ उडाली आहे. तसेच जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दोन काश्मिरी डॉक्टरांच्या अटकेचे वर्णन आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश असे केले आहे. पोलिसांनी अनंतनाग येथील रहिवासी काश्मिरी डॉ. आदिल अहमद राथेर, उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून आणि डॉ. मुझम्मिल अहमद गनई, हरियाणातील फरिदाबाद येथून अटक केली आहे. महिला डॉक्टरची भूमिका देखील समोर येत आहे.

जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी आपल्या सुरुवातीच्या निवेदनात म्हटले आहे की आतापर्यंत दोन डॉक्टरांसह एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मद (जेईएम) आणि अन्सार गजवत-उल-हिंद (एजीयूएच) या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांशी जोडलेले असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिस अनंतनागसह विविध भागात शोध मोहीम राबवत असताना, हरियाणा पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे. आरिफ निसार दार उर्फ साहिल (रा. नौगाम, श्रीनगर), यासिर-उल-अशरफ, (नौगाम, श्रीनगर), मकसूद अहमद दार उर्फ शाहिद (नौगाम, श्रीनगर), मौलवी इरफान अहमद (शोपियान), जमीर अहमद अहंगर उर्फ मुतलाशा, (वाकुरा, गंदरबल), डॉ. मुझम्मिल अहमद गनई उर्फ मुसैब, (कोइल, पुलवामा), डॉ. अदील, (वानपोरा, कुलगाम) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अटक केलेले आरोपी पाकिस्तान आणि इतर देशांमधून कार्यरत असलेल्या परदेशी हँडलर्सच्या संपर्कात आहेत. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी सांगितले आहे की आतापर्यंतच्या तपासादरम्यान गुन्हेगारी कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, शस्त्रे/दारूगोळा आणि आयईडी बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपींकडून एक चायनीज स्टार पिस्तूल (दारूगोळा), एक बेरेटा पिस्तूल (दारूगोळा), एक एके-५६ रायफल (दारूगोळा) आणि एके-क्रिन्कोव्ह रायफल (दारूगोळा) जप्त करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, फरिदाबादमध्ये २९०० किलोग्राम आयईडी बनवण्याचे साहित्य (स्फोटके, रसायने, अभिकर्मक, ज्वलनशील पदार्थ, इलेक्ट्रॉनिक सर्किट, बॅटरी, वायर, रिमोट कंट्रोल, टायमर आणि धातूचे पत्रे) जप्त करण्यात आले.

हे ही वाचा:

द्वेष प्रसारासाठी पुस्तके प्रकाशित करून बेकायदेशीर परदेशी निधी मिळवल्याबद्दल फरहानला अटक

कर्नाटकातील तुरुंगात कैद्यांचे नाचगाणे; तुरुंग अधिकाऱ्याची बदली

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंना डच्चू देत काँग्रेसचा स्वबळाचा नारा!

उत्तर प्रदेशमधील शैक्षणिक संस्थांमध्ये ‘वंदे मातरम्’ गाणे अनिवार्य!

फरिदाबादच्या अल-फलाह विद्यापीठात काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरच्या कारमध्ये असॉल्ट रायफल आढळून आल्याने तिच्या सहभागाची चौकशी सुरू आहे. डॉ. मुझम्मल याने स्फोटके आणि शस्त्रे ठेवण्यासाठी विद्यापीठाजवळ एक स्वतंत्र खोली भाड्याने घेतल्याचे उघड झाले आहे. फरिदाबादचे पोलिस आयुक्त सतेंद्र कुमार गुप्ता यांनी याची पुष्टी केली. मुझम्मल याच्या अटकेनंतर सुमारे १० दिवसांनी, पोलिसांनी फरिदाबादच्या धौल परिसरातील त्याच्या भाड्याच्या घराची झडती घेतली, जिथे ३६० किलोग्राम अत्यंत ज्वलनशील पदार्थ जप्त करण्यात आले. ते अमोनियम नायट्रेट असल्याचे मानले जाते. यासोबतच मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या वस्तूंमध्ये तीन मॅगझिन आणि ८३ जिवंत काडतुसे असलेली एक असॉल्ट रायफल, आठ जिवंत काडतुसे असलेली एक पिस्तूल, दोन रिकामे काडतुसे, दोन सुटे मॅगझिन, १२ सुटकेस, स्फोटकांनी भरलेली एक बादली, २० टायमर, चार बॅटरी, एक रिमोट, पाच किलो हेवी मेटल आणि एक वॉकी-टॉकी सेट यांचा समावेश आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा