23 C
Mumbai
Monday, December 15, 2025
घरक्राईमनामापेट्रोलियम कंपनीची बोगस वेबसाईट बनवून घातला लाखोंचा गंडा

पेट्रोलियम कंपनीची बोगस वेबसाईट बनवून घातला लाखोंचा गंडा

ऑनलाइन बोगस वेबसाइट बनवून पेट्रोलियम कंपण्याचा दिशभुल करण्याचा प्रयत्न

Google News Follow

Related

सायबर गुन्हेगारीच्या घटना वाढत असून, त्यात आता आणखी भर पडली आहे. पेट्रोलियम कंपनीच्या नावाने इंटरनेटवर बनावट वेब साईट बनवून जाळे तयार करण्यात आले आहेत. तसेच हे जाळे तयार करून फसवणूक करणाऱ्या बिहार राज्यातील बिट्टुकुमार साकेत यादव (२४) तर अभिषेक अरविंदकुमार भारती या दोन तरुणांना पकडण्यात आले असून, मुंबई पोलिस दलाच्या बीकेसी पोलिसांनी भामट्याना बेड्या घातल्या आहेत. तसेच या आरोपींनी पाच वेब साईट तयार केल्या असून त्यांच्याकडून जप्त केलेल्या डेटामध्ये ५०० हुन अधिक जणांची माहिती आढळली आहे. तसेच त्यांच्या बँक खात्यातून लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे प्रथम तपासात उघड झाले आहे.

कंपनीच्या नावाने सीएनजी पंप डीलर शिप घेण्यासाठी मुंबईतील ४ जण इच्छुक होते. त्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून सर्च केले असता त्यांना पेट्रोलियम कंपनीची बोगस वेबसाईट आढळली. त्या वेबसाईटच्या माध्यमातून चौघांनी ४ लाख २५ हजार रुपयांची रोकड ऑनलाइन स्वरूपात बँक खात्यात भरल्याची माहिती उघड झाली आहे. तसेच सीएनजी कंपनी सध्या तरी पंप देण्यासाठी कोणतीही प्रोसेस होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले असता या अर्जदारांनी महानगर गॅसचे कार्यालय गाठून बोगस वेबसाइटची पोलखोल केली.

हे ही वाचा:

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

‘जन धन’ नावाचा चमत्कार!

‘जॉन्सन बेबी पावडर’चा उत्पादन परवाना कायमचा रद्द

आपचे आमदार अमानतुल्ला खान यांना एसीबीकडून अटक

महानगर गॅस कंपनीच्या सेंक्युरीटीच्या मॅनेजर ने बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार केली. तपासणीसाठी पोलीस निरीक्षक विश्राम अभ्यंकर व राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक बिहारला रवाना झाले. तेथील पाटना जिल्ह्यात सापळा रचून दोघांना अटक करण्यात आले. स्थानिक न्यायालयात हजर केले असता ट्रान्सीट रिमांडद्वारे त्यांना मुंबईत आणले गेले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा