26 C
Mumbai
Saturday, September 19, 2026
घरक्राईमनामाओंकार शिंदेच्या वकिलांचा अजब दावा

ओंकार शिंदेच्या वकिलांचा अजब दावा

मालाड प्राध्यापक हत्या प्रकरणातील आरोपीला ७ दिवसाची पोलीस कोठडी

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

मुंबईतील मालाड रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या चाकूहल्ल्याच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात ओंकार शिंदे याच्यावर प्राध्यापक आलोक सिंग यांच्यावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मात्र, आरोपी आणि त्याच्या वकिलांकडून हे आरोप ठामपणे फेटाळण्यात आले असून प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. आरोपी ओंकार शिंदेच्या वकिलांनी माध्यमांशी बोलताना दावा केला की, “ओंकारने कोणताही चाकूहल्ला केलेला नाही. त्याला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले असून या घटनेशी त्याचा थेट संबंध नाही.” तपासातून सत्य समोर येईल आणि ओंकार शिंदे निर्दोष असल्याचे सिद्ध होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा:
तेजस्वी यादव यांची आरजेडीच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

भारत–युरोपियन संघ मुक्त व्यापार करार

कॅनडात गोळीबार; भारतीय वंशाचा २८ वर्षीय युवक ठार

ट्रम्पवादळानंतर अमेरिकेत हिमवादळ; १३ हजार उड्डाणे रद्द

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मालाड रेल्वे स्थानकाजवळ दोघांमध्ये आधी शाब्दिक वाद झाला. वाद वाढत गेल्यानंतर हाणामारी झाली आणि त्याच दरम्यान धारदार शस्त्राने हल्ला झाल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात आलोक सिंग गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. तसेच प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्याचे कामही सुरू आहे.

दरम्यान, आरोपीच्या वकिलांनी तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. “खरा आरोपी कोण आहे, हे तपासातूनच स्पष्ट होईल. आमच्या क्लायंटची विनाकारण बदनामी केली जात आहे,” असेही त्यांनी सांगितले. या घटनेनंतर मालाड रेल्वे स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या पोलीस संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून पुढील कारवाई तपासाच्या निष्कर्षांनंतर केली जाणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
334,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा