31 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरक्राईमनामाविकृतीने ओलांडल्या मर्यादा! घोरपडीवर बलात्कार केल्याप्रकरणी तरुण अटकेत

विकृतीने ओलांडल्या मर्यादा! घोरपडीवर बलात्कार केल्याप्रकरणी तरुण अटकेत

Google News Follow

Related

एका विकृत तरुणाने घोरपडी वर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर मधून पुढे आली आहे. कोल्हापूर मधील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात हा प्रकार घडला असून या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत तरुणाला ताब्यात घेतले आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात असलेल्या गोठणे येथील गाभा क्षेत्रात तीन तरुण शस्त्रास्त्र घेऊन फिरत होते. शिकारीसाठी ते या क्षेत्रात आले होते. या तीन तरुणांपैकी एकाच्या अंगातील विकृतीने कळस गाठला असून त्याने या जंगलातील घोरपडीला आपल्या वासनेचे शिकार बनवले. मोबाईल वरील रेकॉर्डच्या आधारे स्थानिक वनाधिकाऱ्यांना ही माहिती मिळाली.

हे ही वाचा:

यशवंत जाधवांच्या डायरीत ‘मातोश्री’नंतर आता केबलमॅन, M-TAI

विक्रांत घोटाळ्याचे पुरावे राऊतांनीच द्यावेत! पण त्यांच्याकडे कागदोपत्री कोणताच पुरावा नाही

लेक्चरदरम्यान हिंदू देवतांचा अपमान करणारा प्रोफेसर निलंबित

वसंत मोरेंची मनसे पुणे शहर अध्यक्षपदावरून हकालपट्टी! भोंग्यांबाबतची भूमिका भोवली?

नेमके काय घडले?
व्याघ्रगणना करण्याच्या हेतूने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात लावलेल्या छुप्या कॅमेरात ३१ मार्चच्या दिवशी तीन आरोपी शस्त्रांसह वावरताना दिसून आले. शिकारीसाठी आलेल्या या आरोपींचा शोध घेत पोलिसांनी या तिघांनाही अटक केली. यापैकी एका आरोपीला हातीव गावातून ताब्यात घेण्यात आले, तर कोकणातील संगमेश्वर तालुक्यात दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

यावेळी पोलिसांनी आरोपींकडून दोन बंदुकी आणि दोन दुचाकी जप्त केल्या. तर त्याच वेळी त्यांचे मोबाईलही ताब्यात घेतले. यावेळी मोबाईल मध्ये एक आरोपी चक्क घोरपडीसोबत संभोग करतानाचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला. या प्रकरणात पोलीस तपास करत असून त्या घोरपडीचे पुढे काय झाले? ती जिवंत राहिली कि तीला मारण्यात आले? इतर कोणत्या वन्यजीवासोबतही असा घृणास्पद प्रकार करण्यात आला का? याबाबत पोलिसांची चौकशी सुरू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा