27.9 C
Mumbai
Saturday, October 10, 2026
घरक्राईमनामाभावजयीवर ऍसिड हल्ला

भावजयीवर ऍसिड हल्ला

Google News Follow

Related

सोनाराच्या दुकानात कामाला जात असल्याच्या रागातून दिराने सोनाराच्या दुकानातून घुसून भावजयीवर ऍसिड हल्ला केल्याची संतापजनक घटना घाटकोपर येथे गुरुवारी उघडकीस आली आहे. या ऍसिड हल्ल्यात भावजय गंभीररीत्या भाजली असून दुकान मालक देखील किरकोळ भाजला आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दिराला अटक केली आहे.

प्रबुद्ध कांबळे (४५) असे आरोपी दिराचे नाव आहे. घाटकोपर येथील पारसी वाडी येथील घासवाला चाळ येथे राहणाऱ्या आरोपी प्रबुद्ध कांबळे याची भावजय जवळच्या सोनाराच्या दुकानात कामाला जात होती. मात्र भावजयीने सोनाराच्या दुकानात नोकरी करू नये म्हणून दीर प्रबुद्ध याचे म्हणणे होते. मात्र नोकरी मिळत नसल्यामुळे पीडितेने कुटुंब चालवण्यासाठी ती नोकरी पत्करली होती. याचा राग येऊन बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास प्रबुद्ध कांबळे हा बाटलीमध्ये ऍसिड घेऊन भावजय काम करते त्या ठिकाणी आला.

हे ही वाचा:

तीन महिन्यांच्या मुलीला पुरणाऱ्या तृतीयपंथीयांना अटक

‘शरद पवार हाजीर हो’…कोरेगाव भीमा प्रकरणात लवकरच नोंदवणार साक्ष

संजय राऊतांची मते वैयक्तिक स्वरूपाची…भाजपाने मला संपवायचा प्रश्नच नाही

अमितभाईंकडे काही गोष्टी गेल्या की, अनेकांना कापरे भरते

त्यात पीडितेच चेहरा गंभीररीत्या भाजला असून दुकानाचे मालक सुधांशु प्रामाणिक आणि त्याची पत्नी हे किरकोळ भाजले आहे. या हल्ल्यानंतर प्रबुद्ध कांबळे याने तेथून पळ काढला. गंभीर भाजलेल्या पीडितेला आणि दुकान मालक यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात आणण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी दीर प्रबुद्ध कांबळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला शुक्रवारी अटक करण्यात आली असल्याची माहिती घाटकोपर पोलिसांनी दिली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा