25 C
Mumbai
Sunday, January 25, 2026
घरक्राईमनामा५० हून अधिक हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्याला लखनौमधून ठोकल्या बेड्या

५० हून अधिक हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्याला लखनौमधून ठोकल्या बेड्या

उपचार सभांच्या नावाखाली सुरू होते धर्मांतर

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये पोलिसांनी धर्मांतर रॅकेटची भांडाफोड केली आहे. उपचार शिबिरांच्या नावाखाली धर्मांतराचे काम सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत एकाला बेड्या ठोकल्या असून इतर आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. मलखान असे आरोपीचे नाव आहे.

लखनौमधील निगोहन पोलिसांनी बक्तौरीखेडा आणि आसपासच्या भागातील ५० हून अधिक हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्या मलखान याला अटक केली आहे. तो उपचार सभेत कमी शिक्षित अनुसूचित जातीच्या लोकांना लक्ष्य करायचा. संधिवात, श्वसन आणि इतर गंभीर आजार बरे करण्याच्या बहाण्याने त्यांना प्रार्थना सभेला बोलावायचा आणि त्यांना बायबल शिकवायचा. त्यांच्यावर पवित्र पाणी शिंपडायचा आणि प्रोजेक्टरवर व्हिडिओ दाखवायचा. तो लोकांचे ब्रेनवॉश करायचा आणि त्यांना हिंदू देवी- देवतांच्या विरोधात भडकावायचा. तसेच आर्थिक प्रलोभन देऊन त्यांना ख्रिश्चन बनवायचा.

पोलिस उपायुक्त (दक्षिण) निपुण अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी मलखान हा निगोहनमधील मेहंदौलीमधील बकटौरी खेडा येथील रहिवासी आहे. गेल्या काही काळापासून धर्मांतराच्या बातम्या येत होत्या. त्यामुळे एसीपी मोहनलालगंज रजनीश वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले. पुरावे गोळा केल्यानंतर, पोलिस पथकाने शनिवारी हुलास खेडा रोडवरून मलखानला अटक केली.

हे ही वाचा:

सूर्यकुमार यादवकडून स्पर्धेचे मानधन पहलगाम पीडितांच्या कुटुंबियांना आणि सैन्याला

आशिया कप ट्रॉफी, भारतीय खेळाडूंची पदके हरलेल्या पाकने चोरली!

आशिया कप: भारताच्या विजयानंतर मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’ची करून दिली आठवण

भारताचे ऑपरेशन सिंदूरनंतर ऑपरेशन ‘तिलक’

चौकशीदरम्यान असे उघड झाले की त्याने सुमारे १० वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर मॅथ्यू हे नाव धारण केले. त्याने त्याच्या भावांची, पुतण्यांची आणि मुलांची नावेही बदलली. त्यानंतर, त्याने त्याच्या शेतात एक खोली बांधली आणि महिन्यातून दोनदा उपचार सभा घेण्यास सुरुवात केली. तो महिला, मुले आणि पुरुषांना या सभांमध्ये आमंत्रित करत होता, त्यांना उपचार आणि आर्थिक मदतीचे आमिष दाखवत होता. त्यानंतर त्याने त्यांना धर्मांतरित केले. त्याने आतापर्यंत शेजारच्या गावातील सुमारे ५० लोकांचे धर्मांतर केले आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. त्याच्या घरातून दोन बायबल आणि प्रचारात्मक साहित्य जप्त करण्यात आले. तसेच ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर मलखानने लोकांना आर्थिक मदतही केली. त्याला कोणी निधी दिला याचा तपास सुरू आहे. मलखान आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या बँक खात्यांची तपासणी केली जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा