26 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरक्राईमनामाफेस-स्वॅपिंग तंत्रज्ञानाच्या आधारे मित्र असल्याची बतावणी करत लुटले पाच कोटी

फेस-स्वॅपिंग तंत्रज्ञानाच्या आधारे मित्र असल्याची बतावणी करत लुटले पाच कोटी

लोकांना या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे संभाव्य तोटेही जाणवू लागले आहेत.

Google News Follow

Related

कृत्रिम बुद्धिमतेतील फेस-स्वॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर करून एका सायबरचोराने मित्र असल्याची बतावणी करून त्याची पाच कोटींची फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली आहे.

 

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या युगात जगभरातील व्यक्ती त्यांचे जीवन सोपे करण्यासाठी तंत्रज्ञान वापराचे नवीन मार्ग शोधत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर निबंध आणि कविता लिहिण्यासाठी, संहिता सुलभ आणि स्पष्ट करण्यासाठी, कविता आणि संगीत तयार करण्यासाठी आणि बरेच काही करण्यासाठी केला जात आहे. मात्र लोकांना या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे संभाव्य तोटेही जाणवू लागले आहेत.

 

खोट्या प्रतिमा आणि व्हिडिओ तयार करणे त्यापैकी एक आहे. उत्तर चीनमधील एका व्यक्तीने एक पाऊल पुढे टाकून ‘डीपफेक’ तंत्रज्ञानाचा वापर करून एका माणसाची पाच कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केली आहे. ‘डीपफेक’ हे तंत्रज्ञान ऑनलाइन बनावट प्रतिमा आणि व्हिडिओंचा वापर करून वास्तवतेचा आभास निर्माण करतात आणि चुकीची माहिती पसरवण्यासाठी वापरली जाऊ शकतात.

 

रॉयटर्सच्या अहवालानुसार, उत्तर चीनमधील एका घोटाळेबाजाने अत्यंत प्रगत ‘डीपफेक’ तंत्रज्ञानाचा वापर केला आणि एका माणसाला त्याच्या खात्यात पैसे हस्तांतरित करण्यास पटवले. घोटाळेबाजाने ‘फेस-स्वॅपिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करून आपण त्या व्यक्तीचा जवळचा मित्र असल्याचे भासवले. बाओटौ शहरातील पोलिसांनी सांगितले की, फसवणूक करणाऱ्याने व्हिडिओ कॉलवर असताना या व्यक्तीचा मित्र असल्याचे भासवून त्याला ४.४ दशलक्ष युआन हस्तांतरित करण्यास सांगितले.

हे ही वाचा:

निवडणूक लढवल्याबद्दल १० वर्षांपूर्वी नोकरीवरून काढलेल्या परिचारिकेला दिलासा

परस्पर विश्वास, आदर हे भारत-ऑस्ट्रेलिया दृढ संबंधांचे सूत्र

आदित्य ठाकरेंना लोकशाही का दिसत नाही?

एक्स्प्रेस वेवर १७ महिन्यांत ३५ वाहनांना आग

ही किंमत भारतीय मूल्यात पाच कोटी रुपये इतकी आहे. या व्यक्तीला मित्राला खरोखरच पैशांची निकडीची गरज आहे, असे वाटले आणि त्याने ही रक्कम हस्तांतरित केली. त्या व्यक्तीच्या खऱ्या मित्राने त्याला खरी परिस्थिती समजावल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी चोरीला गेलेले बहुतेक पैसे जप्त केले असले तरी उर्वरित रकमेचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. आर्थिक गुन्हे करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात असल्याबद्दल चीनमध्ये चिंता वाढली आहे.

 

अमेरिकेतही लुटीचा प्रयत्न

गेल्या महिन्यात, एका प्रकरणात सायबरचोराने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून किशोरवयीन मुलीचा आवाज क्लोन केला आणि तिच्या आईकडून खंडणी मागितली होती. ऍरिझोना येथील एका महिलेला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. तिची १५ वर्षांची मुलगी स्कीइंग ट्रिपला गेली होती. तिने फोन उचलताच त्या महिलेला तिच्या मुलीचा ‘आई’ म्हणत रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यानंतर एका पुरुषाचा आवाज आला आणि त्याने त्या महिलेला पोलिसांकडे न जाण्याची धमकी दिली. हे संभाषण सुरू असताना तिला त्याच्या मागे तिच्या मुलीचा आवाज ऐकू येत होता. ती मदतीसाठी हाक मारत होती. त्यानंतर त्या व्यक्तीने मुलीला सोडण्यासाठी १० लाख डॉलर्सची मागणी केली. मात्र तो आवाज तिच्या मुलीचा नव्हता. तिची मुलगी सुरक्षित होती आणि तिचे अपहरण झाले नव्हते. ‘मला एका सेकंदासाठीही शंका आली नाही की ती माझी मुलगी नाही,’ असे या आईने पत्रकारांना माहिती देताना सांगितले होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा