मुंबईतील मानखुर्द येथे इस्लामिक कट्टरपंथीयांनी दुर्गा देवीच्या मूर्तीची तोडफोड केली. ही घटना रविवारी (२१ सप्टेंबर ) रात्री १० वाजता घडली. तणावाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आतापर्यंत या प्रकरणात ७ जणांना अटक करण्यात आली आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी देखील घटनास्थळाला भेट दिली.
भाविकांच्या म्हणण्यानुसार, ते ढोल वाजवत दुर्गा देवीच्या घोषणा देत जात होते. दरम्यान, मूर्ती मशिदीजवळून घेऊन जात असताना, तलवारी आणि काठ्या घेऊन मुस्लिम जमाव तेथे आला. या लोकांनी दुर्गा देवीच्या भक्तांना मारहाण केली आणि मूर्तीचे नुकसान केले. घटनेनंतर परिसरात तणाव आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि चौकशी केल्यानंतर आरोपींना अटक केली.
हे ही वाचा :
“युपीत ‘ऑपरेशन कलावा’: लव्ह जिहाद पीडितांना परत आणण्यासाठी ‘नवदुर्गा टास्क फोर्स’”
पूनम पांडे मंदोदरीची भूमिका साकारणार नाही!
मनीष तिवारी यांच्या पोस्टनंतर भाजपने राहुल गांधींना केले लक्ष्य
अमित शाह, अजित डोभाल यांच्या नावे केले बनावट कॉन्फरन्स कॉल आणि…
किरीट सोमय्या यांनी घटनास्थळाला भेट दिली. ते पोस्टकरत म्हणाले- दुर्गामाता मंदिर, साठे नगर येथे देवीचे आज (२३ सप्टेंबर) दर्शन घेणार आहे. (बाबा साहेब आंबेडकर चाळ अण्णा भाऊ साठे नगर, लल्लूभाई कंपाऊंड जवळ मानखुर्द ) नवरात्र सुरू होण्यापूर्वी काही धर्मांध अतिरेकी गुंडांनी दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला होता.
घटनास्थळाला भेट दिल्यानंतर ते म्हणाले, पोलिसांनी आराबाज शेख, पप्पू , आरामान, साहिब, मुजीब, मुस्तफा, इब्बो, रियाज सलीम सह दहा आरोपींना अटक केली आहे. अरबाज शेख हा तडीपार आरोपी असून त्याच्यावर MTDP अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे.
Video coming up from Govandi, Maharashtra, where Islamists attacked the murti of Maa Durga and desecrated, even before it's sthapna, as the procession crossed a mosque.
The conflict began with opposition to the dhol by the Muslim community, leading to the desecration of the idol… pic.twitter.com/s1gQTAF4Ai
— Subhi Vishwakarma (@subhi_karma) September 22, 2025
मी आज दुपारी 2 वाजता (मंगळवार 23 सप्टेंबर)
दुर्गामाता मंदिर, साठे नगर येथे देवी चे दर्शन घेणार.
(बाबा साहेब आंबेडकर चाळ अण्णा भाऊ साठे नगर, लल्लूभाई कंपाऊंड जवळ मानखुर्द )
नवरात्र सुरू होण्या पूर्वी काही धर्मांध अतिरेकी गुंडांनी दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड करण्याचा प्रयत्न… pic.twitter.com/tWofzq6P4V
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 23, 2025







