22 C
Mumbai
Sunday, January 11, 2026
घरक्राईमनामा८५० कोटींचा डिजिटल गुंतवणूक घोटाळा; फाल्कन इनवॉइस डिस्काउंटिंगचा एमडी अटकेत

८५० कोटींचा डिजिटल गुंतवणूक घोटाळा; फाल्कन इनवॉइस डिस्काउंटिंगचा एमडी अटकेत

आतापर्यंत ११ जणांना अटक

Google News Follow

Related

तेलंगणा पोलिसांनी तब्बल ८५० कोटी रुपयांच्या बहुचर्चित डिजिटल गुंतवणूक घोटाळ्यात मोठी कारवाई करत फाल्कन इनवॉइस डिस्काउंटिंग कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक अमरदीप कुमार याला अटक केली आहे. आखाती देशांतून परतल्यानंतर सोमवारी रात्री मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताताच लुकआउट सर्क्युलरच्या आधारे त्याला ताब्यात घेण्यात आले. ५ जानेवारी २०२६ रोजी इराणहून भारतात परतताच ही अटक करण्यात आली असून, ही कारवाई तपासातील महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे.

तेलंगणा सीआयडीच्या तपासानुसार, अमरदीपने एमएस कॅपिटल प्रोटेक्शन फोर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून ‘फाल्कन इनवॉइस डिस्काउंटिंग’ या ब्रँडखाली बनावट डिजिटल गुंतवणूक योजना राबवल्या. अल्प कालावधीत जादा परताव्याचे आमिष दाखवत हजारो गुंतवणूकदारांना ऍप आधारित डिजिटल डिपॉझिट योजनेत पैसे गुंतविण्यास प्रवृत्त करण्यात आले. गुंतवणूक बहुराष्ट्रीय कंपन्या व शेअर बाजाराशी जोडलेली असल्याचा खोटा दावा करण्यात आला.

हे ही वाचा:

अमेरिका–चीन तणाव वाढला, व्हेनेझुएलावरून वाद

डावलल्याने संतापलेले कार्यकर्ते जलील यांच्या कारमागे धावले

पंतप्रधान मोदींशी आपले चांगले संबंध !

जवाहरलाल नेहरू यांनी सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणास नकार दिला होता

आरोपीने बनावट वेबसाइट्स आणि मोबाईल ऍप्स तयार करून नामांकित कंपन्यांच्या नावाने खोट्या इनवॉइस डिस्काउंटिंग डील्स सादर केल्याचे तपासात उघड झाले आहे. या माध्यमातून सुमारे ७,०५६ ठेवीदारांकडून ४,२१५ कोटी रुपये गोळा करण्यात आले. यापैकी ४,०६५ गुंतवणूकदारांना सुमारे ७९२ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. घोटाळा उघडकीस येताच अमरदीप पत्नीसमवेत चार्टर्ड विमानाने दुबईला पळून गेला होता.

आतापर्यंत या प्रकरणात कंपनीचे संचालक, वरिष्ठ अधिकारी व चार्टर्ड अकाउंटंटसह ११ जणांना अटक करण्यात आली आहे. सीआयडीने ४३ कोटी रुपयांच्या मालमत्तेची ओळख पटवली असून, जप्तीची प्रक्रिया सुरू आहे. संपूर्ण तपास अतिरिक्त पोलीस महासंचालक चारु सिन्हा यांच्या देखरेखीखाली सुरू असून, आर्थिक व्यवहारांचा संपूर्ण मागोवा घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा