30 C
Mumbai
Monday, December 8, 2025
घरक्राईमनामा... म्हणून त्याने रचला स्वतःच्या मृत्यूचा बनाव!

… म्हणून त्याने रचला स्वतःच्या मृत्यूचा बनाव!

Google News Follow

Related

इन्शुरन्सची मोठी रक्कम मिळवण्याच्या अमिषापोटी अहमदनगरमध्ये एका व्यक्तीने स्वतःच्याच मृत्यूचा बनाव रचला. त्यासाठी चक्क त्याने एका मनोरुग्णाचा खून केल्याचे प्रकरण समोर आले आहे. मात्र, या रचलेल्या सापळ्यात तो स्वत:च अडकला आणि थेट तुरुंगात गेला. अहमदनगरमधल्या अकोले तालुक्यातील राजूर पोलिसांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणला असून मुख्य आरोपीसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील राजूर मधील धामणगाव पाट या गावात हा धक्कादायक प्रकार घडला. गेल्या वीस वर्षांपासून अमेरिकेत स्वयंपाकी म्हणून नोकरी करणाऱ्या प्रभाकर वाकचौरे यांनी २०१३ साली बायकोचा १० लाख डॉलरचा आणि स्वतःचा ५० लाख डॉलरचा अमेरिकेत ऑल स्टेट इन्शुरन्स कंपनीकडे इन्शुरन्स काढला होता.

हे ही वाचा:

आर्यन खानला आज जामीन मिळणार?

धक्कादायक! महाराष्ट्रात दहा महिन्यांत २० वाघांचा मृत्यू!

भाडेवाढीतून एसटीला मिळणार इतके कोटी

आयकर विभागानेही पूर्ण केले १०० कोटींचे टार्गेट

इन्शुरन्सचा क्लेम मिळावा यासाठी प्रभाकर आपल्या गावी आला. आपल्या चार साथीदारांच्या मदतीने चार महिने नियोजन करून त्याने कट रचला आणि एका मनोरुग्ण व्यक्तीचा विषारी सापाच्या दंशाने खून करून स्वतःचा मृत्यू झाल्याचे पुरावे तयार केले. हे सर्व पुरावे आणि कागदपत्र वाकचौरे याने इन्शुरन्स कंपनीकडे सादर केले.

मात्र, या कागदपत्रांची पडताळणी करताना या प्रकरणात काहीतरी गडबड असल्याचा संशय इन्शुरन्स कंपनीला आल्याने त्यांनी राजूर पोलिसांची मदत घेतली. राजूर पोलिसांनी तपास केला त्यावेळी प्रभाकर वाघचौरे जिवंत असल्याचे समोर आले. पोलिसांनी प्रभाकरला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर प्रभाकर आणि त्याच्या चार साथीदारांनी नवनाथ अनप या मनोरुग्णाची विषारी सापांच्या दंशाने हत्या केल्याची कबुली दिली.

प्रभाकर वाकचौरे याने इन्शुरन्सचे ३७ कोटी रुपये मिळवण्यासाठी एका मनोरुग्ण व्यक्तीची हत्या केली आणि हा बनाव रचला. या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा