28.8 C
Mumbai
Sunday, August 9, 2026
घरक्राईमनामामाहीममध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार; १७ वर्षीय मुलाला अटक

माहीममध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार; १७ वर्षीय मुलाला अटक

फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचाही आरोप

Google News Follow

Related

माहिम परिसरात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळा सुटल्यानंतर मुलीला दुचाकीवरून निर्जन ठिकाणी नेऊन तिचे हात व तोंड बांधून अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी माहिम पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेऊन त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १८ जून रोजी माहिममधील एका शाळेजवळ हा प्रकार घडल्याची तक्रार पीडित मुलीने केली आहे. आरोपी मुलगा आणि पीडिता एकाच परिसरात राहत असून त्यांच्यात मैत्री होती, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून एका निर्जन ठिकाणी नेल्याचा आरोप आहे.

हे ही वाचा:

‘मला माझ्या उत्तराखंडमध्ये घर घ्यायचंय!’

चीनच्या ‘मॅप वॉर’ला भारताचे प्रत्युत्तर; अरुणाचलमधील २७ ठिकाणांना अधिकृत ओळख

बंगळुरूतील पंचतारांकित हॉटेल्समधून कालबाह्य दूध, खराब मांस जप्त

सलमान खानच्या घराबाहेर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाचा मृत्यू

तेथे पीडितेचे हात व तोंड बांधून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. या प्रकारात आणखी एक अनोळखी इसम सहभागी असल्याचाही आरोप पीडितेने केला आहे. तसेच, तिचे फोटो एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि बदनामी करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, पीडितेच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह छायाचित्र आढळल्यानंतर कुटुंबीयांना या प्रकाराची माहिती मिळाली. त्यानंतर कुटुंबीयांनी माहिम पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

पीडितेची भाभा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. पोलिसांनी १७ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याला डोंगरी येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणातील दुसऱ्या अल्पवयीन आरोपीची तसेच तक्रारीत उल्लेख असलेल्या अनोळखी व्यक्तीची भूमिका तपासली जात आहे.

माहिम पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, पीडितेच्या मोबाईलमधील छायाचित्रे आणि इतर डिजिटल पुराव्यांचीही तपासणी केली जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
326,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा