32 C
Mumbai
Tuesday, November 10, 2026
घरक्राईमनामाफटाक्यांचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने बहीण-भावाला बेदम मारहाण

फटाक्यांचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने बहीण-भावाला बेदम मारहाण

मिरा रोडमध्ये संतापजनक प्रकार

Google News Follow

दिवाळीच्या उत्साहात फटाके फोडण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाल्याची संतापजनक घटना मिरा रोड येथील हाटकेश परिसरात घडली आहे. फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे कर्करोगाच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या आईच्या प्रकृतीला त्रास होत असल्याने आवाज कमी करण्याची विनंती करणाऱ्या बहीण-भावाला दोन तरुणांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिरा रोडच्या हाटकेश परिसरातील स्वागत हाइट्स सोसायटीमध्ये रविवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास काही जण मोठ्या आवाजात फटाके फोडत होते. संबंधित महिलेच्या आईला कर्करोग असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आजाराच्या गंभीर अवस्थेमुळे फटाक्यांच्या मोठ्या आवाजाचा आईच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होत असल्याने महिलेने सोसायटीच्या आवारात जाऊन फटाके फोडणाऱ्यांना आवाज कमी करण्याची विनंती केली. मात्र, या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देण्याऐवजी दोन तरुणांनी तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
हे ही वाचा:
हैदराबादच्या भाग्यलक्ष्मी मंदिरात तुफान गर्दीने चारमिनारचे धाबे दणाणले

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय शरद आणि सुनेत्रा पवारांच्याच हाती

अपघातप्रवण ठिकाणी आधीच तैनात असणार रुग्णवाहिका?

बांगलादेशात पुन्हा हिंसाचाराचा भडका; बसला आग लावल्याने चालकाचा मृत्यू

बहिणीसोबत वाद सुरू असल्याची माहिती मिळताच तिचा भाऊही घटनास्थळी पोहोचला. त्यानंतर संबंधित तरुणांनी दोघांनाही शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप पीडितांनी केला आहे. एवढेच नव्हे, तर दोघांना गंभीर परिणाम भोगण्याची धमकीही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकारानंतर पीडित बहीण-भावाने काशीगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

दरम्यान, पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. मात्र, मारहाणीचा प्रकार घडूनही कठोर कारवाई करण्यात आली नसल्याची नाराजी पीडित कुटुंबाने व्यक्त केली आहे. दुसरीकडे, दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे आगीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मिरा-भाईंदर शहरात गेल्या दोन दिवसांत तब्बल १२९ ठिकाणी आग लागल्याच्या घटनांची नोंद अग्निशमन दलाकडे झाली आहे. सण साजरा करताना इतरांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा विचार करण्याची गरज या घटनेने पुन्हा अधोरेखित केली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा