24 C
Mumbai
Tuesday, December 9, 2025
घरक्राईमनामामिरा रोड हत्या प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी म्हणतो, आत्महत्येनंतर तुकडे केले!

मिरा रोड हत्या प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी म्हणतो, आत्महत्येनंतर तुकडे केले!

लिव्ह इन पार्टनरची निर्घृण हत्या केल्याने देशभरात खळबळ

Google News Follow

Related

मिरा रोडमध्ये राहणाऱ्या मनोज साने याने त्याच्या लिव्ह इन पार्टनरची निर्घृण हत्या केल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. मनोज याने त्याच्या पार्टनरच्या मृतदेहाचे लाकूड कापण्याच्या मशीनने तुकडे केले. त्यानंतर हे तुकडे कुकरमध्ये शिजवून आणि मिक्सरमध्ये बारीक करुन त्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांना त्याच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मनोज याने पोलिसांना दिलेल्या कबुलीमुळे या प्रकरणाला वेगळच वळण मिळण्याची शक्यता आहे.

आरोपी मनोज साने याने लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्य हिची हत्या आपण न केल्याचे सांगितले आहे. सरस्वतीने तीन- चार दिवसांपूर्वीच आत्महत्या केली होती, असा खुलासा त्याने केल्याची माहिती समोर आली आहे. सरस्वतीने विष घेऊन आत्महत्या केली. सरस्वतीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे दोघात वाद होत होता. ज्या दिवशी ही घटना घडली. त्या दिवशीही आमच्यात भांडणं झाली. त्यानंतर सरस्वतीने घरी येऊन विष घेऊन आत्महत्या केली, असं मनोजने म्हटले आहे.

सरस्वतीने अशा पद्धतीने आत्महत्या केल्याने घाबरून गेलो होतो. त्यामुळेच तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्लान तयार केला, अशी माहिती मनोज याने दिली. मनोज याच्या घरात पोलिसांणा मृतदेहाचे १२- १३ तुकडे सापडले आहेत. तर पुढील तपास सुरू असून आरोपीच्या कबुलीत किती तथ्य आहे याची चौकशी करण्यासाठी पोलीस मृतदेहाचे पोस्टमार्टम करणार आहेत.

नेमकं प्रकरण काय?

मीरा- भाईंदर येथे उड्डाणपूलाच्या शेजारी गीता आकाशदीप नावाच्या सोसायटीमध्ये मनोज आणि सरस्वती मागच्या तीन वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहायचे. त्याच इमारतीत राहणाऱ्या शेजारच्या लोकांना दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी नयानगर पोलीस ठाण्यात माहिती देऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेताच ही घटना उघडकीस आली.

हे ही वाचा:

अखेर प्रतीक्षा संपली; देवभूमीत मान्सूनचे आगमन!

आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा, रेपो रेट जैसे थे स्थितीत

भारताची ताकद वाढणार, ‘अग्नी प्राइम’ ची यशस्वी चाचणी!

लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये बारिक केले

माहितीनुसार, मृतदेहाचे तुकडे करून आरोपी ते तुकडे कुकरमध्ये टाकायचा, ते उकळायचा त्यानंतर मग मिक्सरमध्ये बारीक करायचा. हे तुकडे पिशवीत भरून इमारतीच्या मागे असलेल्या गटारात फेकून द्यायचा. यासाठी तो त्याच्या बाईकचा वापर करत असे. दरम्यान, गुन्ह्यासाठी वापरलेलं सगळं सामान आणि बाईक पोलिसांनी जप्त केले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा