मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रमुख जितू पटवारी यांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न काही बुरखाधारी लोकांनी केल्याचे उघड झाले. त्याचा सीसीटीव्ही समोर आला आहे.
शुक्रवारी उशिरा रात्री पाच मुखवटाधारी चोरट्यांनी पटवारी यांच्या निवासस्थानी चोरी करण्याचा प्रयत्न केला.
काँग्रेसने ‘एक्स’ (X) वर पोस्ट करून म्हटले:
“इंदौरमधील मध्यप्रदेश काँग्रेस अध्यक्ष जितू पटवारी यांच्या घरात शुक्रवारी रात्री पाचपेक्षा जास्त चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. मुखवटाधारी चोरट्यांनी पटवारींच्या संपूर्ण कार्यालयातही शोधाशोध केली.”
काँग्रेसचा सरकारवर आरोप
काँग्रेसने राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत म्हटले, मुख्यमंत्री/गृहमंत्री हे इंदूरचे प्रभारी मंत्रीसुद्धा आहेत! तरीही राज्यातील कायदा-सुव्यवस्था सतत ढासळत आहे.”
पक्षाने हेही आठवण करून दिले की पटवारी यांच्यावर यापूर्वीही हल्ल्यांचे आणि अपघातांचे पाच चिंताजनक प्रकार घडले आहेत.
हे ही वाचा:
विश्वरुप दर्शनानंतर आले डोके ठिकाणावर?
या योगासनांनी करा स्नायूंना बळकट
लाल किल्ला परिसरात १ कोटींचा रत्नजडित कलश चोरीला!
काँग्रेसने राज्यातील भाजप सरकारवर पटवारी यांच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणाचा आरोप केला. काँग्रेस सतत जितू पटवारी यांना सुरक्षा देण्याची मागणी करत आहे. पण भाजप सरकार बेफिकीर आणि उदासीन राहिले आहे.”
काँग्रेसचा इशारा
काँग्रेसने राज्य सरकारला पुन्हा इशारा देत म्हटले, आम्ही पुन्हा एकदा डॉ. मोहन यादव सरकारला इशारा देतो की जितू पटवारी यांच्या सुरक्षेची तातडीने व्यवस्था केली जावी.







