31 C
Mumbai
Wednesday, February 25, 2026
घरक्राईमनामाआदित्य ठाकरेंना AU म्हटले त्या रागातून माझी बदनामी !

आदित्य ठाकरेंना AU म्हटले त्या रागातून माझी बदनामी !

खासदार राहुल शेवाळे यांची मागणी

Google News Follow

Related

दाऊद आणि पाकिस्तानमधील गँगशी ‘संबंधित असलेल्या त्या महिलेचा एनआयएकडून तपास करा अशी मागणी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. शेवाळे यांनी एका फॅशन डिझायनरचे शोषण केल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या संदर्भात राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या महिलेची एनआयए कडून तपास करा अशी मागणी केली आहे.

या महिलेचा पाकिस्तानी ग्रुप आहे. त्यांच्या गँगमध्ये फराह नावाची पाकिस्तानी महिला आहे. राशीद नावाचा पाकिस्तानी एजंटही आहे. ही फॅशन डिझायनर महिला दाऊद गँगसोबत काम करत आहे. रईस आणि जावेद छोटाली नावाच्या व्यक्ती सोबत ती काम करते. रईस आणि छोटालीसोबत तिचे संबंध आहेत. ती दोघांना परिचित आहे. हे साधंसुधं प्रकरण नाही हा आंतरराष्ट्रीय कट असल्याचा आरोप खा. शेवाळे यांनी केला. काही ऑडिओ क्लिप ऐकवून या महिलेची आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाही या प्रकरणाशी संबंध असल्याचा दावा शेवाळे यांनी यावेळी केला.

शेवाळे पत्रकार परिषदेत म्हणाले की , ही महिला दोन वेळा कराचीला जाऊन आली आहे. या महिलेची दाऊद आणि पाकिस्तानशी लिंक आहे. पाकिस्तानी एजंटच्या मदतीने तिने फेक अकाऊंट सुरू केलं होतं. हे प्रकरण गंभीर असून राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास एनआयएच्या माध्यमातून करावा. त्यातून इंटरनॅशनल रॅकेटचा पर्दाफाश होईल असा दावा शेवाळे यांनी यावेळी केला.

माझा संसार ठाकरेंनी वाचवला असं युवा सेनाप्रमुख सांगत आहेत. पण या महिलेला युवासेनाप्रमुखच पाठिशी घालत आहेत असा आरोप करत शेवाळे यांनी असं केल्याने कुणाचं लग्न वाचतं का? एखाद्याचं आयुष्यच बर्बाद होईल ना? युवासेनाप्रमुखांची विधानेच तशी आहेत असाही दावा त्यांनी केला.

हे ही वाचा : 

माजी सैनिकांचे टेन्शन दूर, आता मिळणार पेन्शन

पाकिस्तान विकणे आहे !

५४ वर्षांपूर्वी याच दिवशी मानव प्रथमच चंद्राच्या कक्षेत

मोदी सरकारची गरिबांना नववर्षाची भेट

या प्रकरणात माझ्यावर गुन्हा दाखल व्हावा असा राष्ट्रवादीचा सुरुवातीपासूच प्रयत्न होता. पण उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची सर्व खात्री करून घेतली होती. या महिलेची कौटुंबीक पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे. तिचा भाऊ गंभीर गुन्ह्यात तुरुंगात आहे. ती मुंबई पोलिसांना सापडत नाही. तिच्या पत्त्यावरही पोलीस जाऊन आले. पण ती सापडत नाही.राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला मात्र ती सापडली. ती राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला कशी सापडली? राष्ट्रवादी पक्ष या प्रकरणाच्या पाठिशी आहे. राष्ट्रवादीचा दाऊदशी सबंध आहे. त्यांचा मंत्री दाऊदशी संबंधित असल्यामुळे तुरुंगात आहे. महिलेच्या वकिलाच्या संभाषणातही नवाब मलिक यांचा उल्लेख आहे. यावरून काय तो अर्थ काढता येतो असा प्रश्न शेवाळे यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी त्यांनी वकिलाच्या संभाषणाची क्लिपही ऐकवली. मी संसदेत AU उल्लेख केला. त्यामुळे युवासेनाप्रमुखांना राग आला आहे. म्हणूनच मला बदनाम करण्यासाठी हे प्रकरण वारंवार काढलं जात आहे, असा दावाही त्यांनी केला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
295,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा