30.1 C
Mumbai
Sunday, June 28, 2026
घरक्राईमनामामोहरम जुलूसात विषारी कॅप्सूल वाटपाचा कट उधळला

मोहरम जुलूसात विषारी कॅप्सूल वाटपाचा कट उधळला

१४,९०० झिंक फॉस्फाईड कॅप्सूलसह पुण्यातील संशयित अटकेत

Google News Follow

Related

मुंबई : मोहरमच्या जुलूसादरम्यान ‘पेन किलर’ असल्याचे भासवून विषारी कॅप्सूलचे वाटप केल्याप्रकरणी भायखळा पोलिसांनी पुण्यातील एका संशयिताला अटक केली असून, त्याच्याकडून झिंक फॉस्फाईड या विषारी रसायनाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सूल जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून, या कटामागे आणखी कोणी आहे का आणि कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध आहेत का, याचाही तपास केला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फय्याज निसार हुसेन प्रेमजी असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. शुक्रवारी भायखळा पूर्व येथील रहमताबाद कब्रस्तान परिसरात मोहरमच्या जुलूसादरम्यान तो कोणतीही अधिकृत परवानगी न घेता नागरिकांना ‘पेन किलर’ असल्याचे सांगून कॅप्सूलचे वाटप करत होता. यापैकी काही कॅप्सूलचे सेवन केल्यानंतर सलमान सय्यद यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तीव्र पोटदुखी व उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयिताला ताब्यात घेतले.
हे ही वाचा:
दोन चक्रीवादळांनी जपान हादरला; १० लाख नागरिकांना स्थलांतराचा इशारा

विमानापेक्षा इमान महत्त्वाचं असते

अज्ञात क्षेपणास्त्राने तेलवाहू टँकरला लक्ष्य; तीन दिवसांतील दुसरी घटना

इंग्लंडमध्ये वैभवची खरी परीक्षा!

तपासात आरोपी गेल्या १५ दिवसांपासून मुंबईत वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे. त्याने डोंगरीतील एका लॉजमध्ये खोली भाड्याने घेतली होती. याच पत्त्यावर ऑनलाइन माध्यमातून झिंक फॉस्फाईड आणि ३० हजार रिकाम्या कॅप्सूल मागवल्याची माहिती पोलीस उपायुक्त जयंत मीना यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलिसांच्या तपासात आरोपीने १४ हजार ९०० विषारी कॅप्सूल तयार केल्याचे निष्पन्न झाले असून, आणखी ३० हजार रिकाम्या कॅप्सूलची तसेच ५० किलो झिंक फॉस्फाईडची मागणी केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांना लक्ष्य करण्याचा कट असावा, असा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

फय्याज प्रेमजी हा बीबीए पदवीधर असून पुण्यात पेंट व्यवसाय करतो. त्याने नुकताच इराण आणि इराकचा दौरा केल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. त्यामुळे त्याचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी काही संबंध आहेत का, याचाही तपास सुरू आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, जप्त करण्यात आलेल्या कॅप्सूल आणि रासायनिक पदार्थांचे न्यायवैद्यक तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आले आहेत. तपासादरम्यान या कटामागील संभाव्य सूत्रधार आणि इतर सहकाऱ्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
318,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा