25 C
Mumbai
Tuesday, January 27, 2026
घरक्राईमनामाछोटा शकीलचा शूटर लईक शेखच्या २५ वर्षांनंतर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

छोटा शकीलचा शूटर लईक शेखच्या २५ वर्षांनंतर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून अटक

Google News Follow

Related

मुंबई पोलिसांनी गँगस्टर छोटा शकीलच्या शूटरला तब्बल २५ वर्षांनंतर अटक केली आहे. हा शूटर गेल्या २५ वर्षांपासून फरार होता. शूटर लईक अहमद फिदा हुसैन शेख (वय ५० वर्षे) याच्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. गँगस्टर मुन्ना धारीच्या हत्येप्रकरणात पोलीस त्याच्या शोधात होती. पायधुनी पोलिसांनी शुक्रवार, २८ जुलै रोजी याला ठाणे रेल्वे स्थानकाजवळ अटक केली.

गँगस्टर छोटा शकीलच्या शूटर शेखने आपल्या साथीदाराच्या मदतीने गँगस्टर मुन्ना धारी याची २ एप्रिल १९९७ रोजी हत्या केली होती. मुन्ना धारी हा छोटा राजन टोळीचा सदस्य होता. त्यावेळी पोलिसांनी लईक अहमद फिदा हुसैन शेखविरुद्ध भादंवि कलम ३०२, ३४ आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल केला होता. यानंतर १९९८ मध्ये न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली होती. जामिनावर सुटल्यानंतर शेख भूमिगत झाला होता.

शेख कोणत्याही न्यायालयीन सुनावणीत हजर झाला नसल्याने त्याला फरारी घोषित करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. तब्बल २५ वर्षे तो फरार होता. दरम्यान, लईक शेख हा मुंब्रा येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी माहितीच्या आधारे मुंब्रा येथे शोध मोहीम राबवली होती. मात्र, शेख तिथे सापडला नाही. विशेष म्हणजे त्याला कोणी ओळखू शकले नाही.

हे ही वाचा:

मोहरमच्या मिरवणुकीत विजेचा शॉक लागून चौघांचा मृत्यू

मलकापूरमध्ये दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; सात प्रवाशांचा मृत्यू

बंगालच्या उपसागरात अडकलेल्या ३६ मच्छिमारांची भारतीय नौदलाकडून सुटका

खांद्यात लागलेली गोळी घेऊन ६०० किमी प्रवास, गुन्हा दाखल होऊ नये म्हणून धावपळ

दरम्यान, शेख हा ठाणे शहरात टॅक्सी चालवण्याचे काम करत असल्याची नवी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सापळा रचत शेख यला ठाणे रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा