28 C
Mumbai
Sunday, September 20, 2026
घरक्राईमनामागोव्यातील आलिशान विलामध्ये घुसून मुंबई पोलिसानी भेदले सायबर रॅकेट

गोव्यातील आलिशान विलामध्ये घुसून मुंबई पोलिसानी भेदले सायबर रॅकेट

४०० कोटींची फसवणूक, सात जणांना अटक

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

गोव्यातील एका आलिशान व्हिलामधून सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीच्या रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी सात आरोपींना अटक करून मुंबईत आणले असून, या टोळीने देशभरातील पीडितांची तब्बल ४०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आधी मालाडमधील एका सोसायटीतून काम करणाऱ्या आणि ‘म्यूल’ (बनावट) बँक खात्यांची व्यवस्था करणाऱ्या तीन जणांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही मोठी कारवाई करण्यात आली.

हे ही वाचा:

तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला नक्की मिळेल!

बाल लैंगिक शोषणाच्या कंटेंटवरुन सरकारचा मेटाला इशारा

आयटीसीकडून सिगारेटच्या किंमतीत पुन्हा वाढ

फाळणी करणारा ब्रिटन फाळणीच्या उंबरठ्यावर

उपायुक्त (DCP) राज तिलक रौशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले सर्व सातही आरोपी मूळचे गुजरातच्या अहमदाबाद, मेहसाणा आणि गांधीनगर भागातील आहेत. आरोपी २० ते ३० वयोगटातील असून त्यांचे शिक्षण केवळ १० वी ते १२ वीपर्यंत झालेले आहे. हे आरोपी गेल्या काही महिन्यांपासून गोव्यातील वेगवेगळ्या व्हिलामध्ये वास्तव्यास होते आणि तेथूनच हे गैरव्यवहार चालवत होते.

तपासात उघड झाले आहे की, आरोपींनी पैसे वळवण्यासाठी स्वतः विकसित केलेल्या एका अ‍ॅपचा वापर केला होता. त्यांना दुबईतील मुख्य सूत्रधारांकडून थेट सूचना मिळत असत. त्या सूचनांच्या आधारे फसवणूक करून मिळवलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम अनेक बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने फिरवली जात होती.
मागील प्रकरणाशी संबंध नाही.

दरम्यान, गेल्या महिन्यात गुन्हे शाखेने गोव्यात अशाच प्रकारे कारवाई करत आणखी एका व्हिलावर छापा टाकला होता. या दोन्ही प्रकरणांची गुन्ह्याची पद्धत (मोडस ऑपरेंडी) सारखीच असली, तरी या दोन्ही टोळ्यांमध्ये थेट संबंध असल्याचा कोणताही पुरावा सध्या समोर आलेला नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या रॅकेटमधील दुबईतील सूत्रधार आणि इतर आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
334,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा