33 C
Mumbai
Monday, October 5, 2026
घरक्राईमनामाआईकडून मतिमंद मुलीची हत्या

आईकडून मतिमंद मुलीची हत्या

Google News Follow

Related

मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जन्मापासून मतिमंद असलेल्या मुलीची हत्या आईनेच केली आहे. आत्महत्या झाल्याचे भासवत त्या आईने मुलीची हत्या केली असून अंधेरी पोलिसांनी त्या आईला अटक केली आहे. मुलीला होणारा त्रास तसेच तीचे भविष्यात कसे होणार या चिंतेत असणाऱ्या आईने तीची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

वैष्णवी पत्याने (१९) असे या दुर्देवी मुलीचे नाव आहे.अंधेरी पूर्व सहार रोड येथील पारसी वाडा येथे वैष्णवी आई वडिलांसोबत राहत होती. जन्मापासून मतिमंद असणारी वैष्णवी १५ जून रोजी राहत्या घरातील हॉलमध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत अंधेरी पोलिसांना आढळून आली होती. मुलीने आत्महत्या केल्याचे तिच्या आईने पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन कूपर रुग्णालयात पूर्व तपासणी साठी पाठविण्यात आला. मात्र मतिमंद मुलगी आत्महत्या कशी करू शकते म्हणून पोलिसांना संशय आला व त्यांनी कूपर रुग्णालयातील डॉक्टर यांच्याशी चर्चा केली. मतिमंद असल्यामुळे ती आत्महत्या नाही करू शकत असे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले.त्यांनतर पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला.

हे ही वाचा:

‘या’ कारणासाठी पंतप्रधान मोदी जाणार गांधीनगरला

उत्तर प्रदेशात ‘बुलडोझर कारवाई’ थांबविण्यास न्यायालयाचा नकार

‘मलिकांचं मंत्रीपद रद्द करा’ सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

अनेक दिवसांनी भारतीय शेअर बाजार तेजीत

पोलिसांनी वैष्णवीची आई श्रद्धा हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तीने हत्येची कबुली दिली. मुलीचे हाल बघवत नव्हते, त्यात आम्ही नसल्यावर भविष्यात तीचे काय होईल ही चिंता सतावत होती, त्यातूनच तिची मुक्तता करण्यासाठी तीचा गळा आवळून हत्या केली अशी कबुली आईने दिली. अंधेरी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आईला अटक केली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा