बकरीदच्या दिवशी ६० वर्षीय व्यक्तीने दिली स्वतःचीच ‘कुर्बानी’.

चिठ्ठीत लिहिले स्वतःवर सुरा चालवण्याचे कारण

बकरीदच्या दिवशी ६० वर्षीय व्यक्तीने दिली स्वतःचीच ‘कुर्बानी’.

उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात बकरीदच्या दिवशी ६० वर्षीय इसमाने आत्महत्या केली. त्याने एक चिठ्ठी सोडली आहे, ज्यात त्याने लिहिले आहे की तो स्वतःला “अल्लासाठी बलिदान” देत आहे.

मृत व्यक्तीचे नाव इश मोहम्मद अन्सारी असून, त्याने शनिवारी सकाळी आपल्या घराशेजारी असलेल्या झोपडीत धारदार चाकूने स्वतःचा गळा चिरला. ओरडण्याचा आवाज ऐकून कुटुंबीयांनी धाव घेतली आणि पोलिसांच्या मदतीने त्याला जवळच्या रुग्णालयात नेले. त्यानंतर त्याला गोरखपूर वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले, मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला.

अन्सारी याने सकाळी १० च्या सुमारास सुलतान सय्यद मखदूम अशरफ शाह दर्गा येथे ईदची नमाज अदा केली होती, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. “घरी परतल्यानंतर ते थेट झोपडीत गेले,” असे त्यांच्या पत्नी हाजरा खातून यांनी PTI वृत्तसंस्थेला सांगितले.

हे ही वाचा:

हमीद – जयराम हे तर मनमोहन देसाईंचे अकबर-एन्थनी

जसबीर सिंगची रिमांड दोन दिवस वाढवली

निक्की तंबोळीने ‘व्हेगन’ आहार स्वीकारण्याचा का घेतला निर्णय

मोदी सरकारने ११ वर्षांत बदलली देशाची विचारधारा

स्थानिकांमध्ये खळबळ

घटनास्थळी सापडलेली हस्तलिखित चिठ्ठी पाहून स्थानिक रहिवासी आणि प्रशासन आश्चर्यचकित झाले. त्या चिठ्ठीत लिहिले होते, मनुष्य बकऱ्याला आपल्या मुलासारखे वाढवतो आणि नंतर त्याची कुर्बानी देतो. तोसुद्धा एक जिवंत प्राणी आहे. आपल्यालाच कुर्बानी द्यायला हवी. मी आपली कुर्बानी अल्लाच्या रसूलच्या नावावर देत आहे.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक अरविंद कुमार वर्मा म्हणाले, “प्राथमिक तपासात अन्सारी यांनी स्वतःला इजा केल्याचे आढळून आले आहे. मात्र आम्ही सर्व कोनातून तपास करत आहोत.”

मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे.

Exit mobile version