बराच काळ केंद्रात सत्तेत नसल्यामुळे काँग्रेस नेत्यांना पक्ष चालवण्यासाठी पैशाची कमतरता पडत असावी. सत्तेत असताना दलाली जोरात होती. पैसा ओरपण्याची सवय जडली असल्यामुळे कितीही पैसा मिळाला तरी यांना कमीच पडतो. त्यामुळे काँग्रेस सध्या कंटेट क्रिएशनचा नवा धंदा सुरू केला आहे. प्रपोगंडासाठी पाकिस्तानकडून या कंटेटचा अर्थात प्रचार सामुग्रीचा वापर होतो. तिथेही पेच आहे, कारण हे रिकाम्या मडक्यांचे काम नाही. यासाठी जी अक्कल लागते, ती ना काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्याकडे आहे. ना त्याच्या चरणी अक्कल गहाण ठेवणाऱ्या गुलामांकडे. बहुधा त्यामुळेच काँग्रेसच्या बिनडोक प्रचाराचे थोबाड एका आठवड्यात दोन वेळा थोबाड फुटलेले आहे.
काँग्रेस नेते जयराम रमेश हे पक्षात असलेले डावे विचारवंत. सध्या राहुल गांधी यांना भाषणाचे मुद्दे पुरवण्याचे काम हेच करतात. ते जे सांगतात, ते राहुल गांधी बोलतात. ते जे लिहून देतात, ते राहुल गांधी वाचतात. त्यांच्या मुद्द्यात दडलेला भारतविरोधी आशय लक्षात घेऊन पाकिस्तानने बहुधा यांची प्रचार सामुग्री वापरायला घेतलेली आहे. त्याच्यासाठी काँग्रेसला काही मेहनताना मिळतो की नाही, हा संशोधनाचा विषय आहे.
काँग्रेस नेत्यांची विधाने ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान पाकिस्तानी सैन्याच्या डीजीआयएसपीआरने राहुल गांधी, वडेट्टीवार या काँग्रेसच्या नेत्यांच्या देशद्रोही विधानांचे व्हीडियो जगाला ऐकवले. तरी सुद्धा यांना लाज वाटली नाही. उलट जोर आला. ऑपरेशन सिंदूरमुळे हबकलेल्या पाकिस्तानी नेत्यांना, पत्रकारांना काँग्रेस नेत्यांची मुक्ताफळे गार गार वाटू लागली तर नवल नाही. सरेंडर मोदी, हा काँग्रेस नेत्यांचा शब्द पाकिस्तानने व्यवस्थित वापरला.
हमीद मीर हा आयएसआयने पोसलेला पत्रकार. आयएसआय़चा प्रपोगंडा चालवण्याचे काम हा करतो. याने आयमन अल जवाहीरी आणि ओसामा बिन लादेनच्या मुलाखती घेतल्या होत्या. म्हणजे याचे आयएसआय कनेक्शन किती तगडे होते याची आपण कल्पना करू शकतो. २०१४ मध्ये बहुधा याचे आयएसआयशी फाटले. तेव्हा याच्यावर हल्ला झाला होता. त्यानंतर आजतागायत हा जिवंत आहे. पत्रकारीती करतो आहे, याचा अर्थ तो आयएसआयला शरण गेला आहे. काँग्रेसने सरेंडर मोदी अशी टिपण्णी केल्यानंतर याच शब्दांचा वापर तो करू लागला. कॅनडामध्ये १५ त १७ जून दरम्यान जी-७ परीषदेचे आयोजन करण्यात आले आहे. भारत या गटाचा सद्स्य नाही. तरी जगातील एक महत्वाचा देश म्हणून गेली सहा वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या जी-७ परीषदेचे निमंत्रण नव्हते. ऑपरेशन सिंदूरनंतर या परिषदेचे आयोजन होते आहे. दोन दिवसापूर्वी पर्यंत मोदी यांना परिषदेचे आमंत्रण आलेले नव्हते. त्यामुळे मनमोहन देसाई यांच्या सिनेमातील बिछडलेले भाऊ असावेत त्याप्रमाणे पाकिस्तानी हमीद मीर आणि काँग्रेस नेते जयराम रमेश. जणू मीर आणि रमेश म्हणजे अकबर आणि एन्थनी. जी-७ चे निमंत्रण मोदींना मिळणार नाही, असे गृहीत धरून मोदींची जादू ओसरली, प्रभाव आटला, अशा प्रचारकी लिखाणाचा पाकिस्तानमध्ये पूर आला. काँग्रेसने त्यात मोलाची भर टाकली.
आधी जयराम रमेश यांनी जी-७ च्या निमंत्रणाच्या मुद्द्यावर एक्सवर पोस्ट टाकली. त्यांना थेट यूपीएच्या काळातील पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आठवले. यूपीएच्या काळात मनमोहन यांना जी-७, जी-८ ची सहा निमंत्रण आली. जागतिक धोरणांबाबत त्यांना विश्वासात घेतले जायचे. परंतु गेल्या सहा वर्षात प्रथमच विश्वगुरू मोदींना या परीषदेचे निमंत्रण नाही. यानिमित्ताने भारताच्या परराष्ट्र धोरणातील भोंगळपणा उघड झाला आहे. हा त्या पोस्टचा भावार्थ.
हे ही वाचा:
‘मॅच फिक्सिंग’च्या विधानावर नड्डा यांचा पलटवार
बिहार निवडणुकीत राहुल गांधींना पराभव दिसतोय
सीसीपीएचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्वयं-लेखा परीक्षणाचे निर्देश
सीसीपीएचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्वयं-लेखा परीक्षणाचे निर्देश
डॉ. मनमोहन सिंह यांना जगात किती मान होता, हे पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनीच उघड केलेलेच आहे. शरीफ हे सिंह यांना देहाती औरत म्हणत असत. ते ओबामाकडे एखाद्या खेडवळ बाईसारखी माझी तक्रार करतात, असे शरीफ म्हणाले होते. मनमोहन सिंह यांची जगात किती प्रतिष्ठा होती, याचे हे उत्तम उदाहरण. आश्चर्य म्हणजे त्यावेळी या अपमानाविरुद्ध एकाही काँग्रेसच्या नेत्याने तोंड उघडले नव्हते. कारण तेव्हा मनमोहन यांचा अपमान हे पक्षाचे धोरणच होते. सोनिया गांधीपासून राहुल गांधींपर्यंत सगळेच त्यांचा अपमान करायचे. लोकाश्रय नसताना पंतप्रधान पदावर बसायची ती किंमत होती. काँग्रेस नेते तोंडात मळी धरून बसले असताना गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी गरजले. त्यांनी नवाज शरीफ यांना सुनावले होते. मनमोहन यांचा अपमान हा हिंदुस्तानचा अपमान असल्याची गर्जना त्यांनी केली. तेच बेरशम काँग्रेसवाले पाकिस्तानच्या हातात हात घालून देशाच्या पंतप्रधानांच्याविरोधात कंटेट निर्मितीला लागले आहेत.
जयराम रमेश जी-७ परीषदेतील निमंत्रणावरून बरळले. त्यानंतर पाकिस्तानचा हमीद मीर बरळला. त्याने नरेंद्र मोदी यांचा उल्लेख सरेंडर मोदी असा केला. जी-७ चे त्यांना निमंत्रण नाही म्हणून टवाळी केली. मोदींचा जागतिक प्रभाव कसा आटतो आहे, त्यावर मीर बोलला. आयएसआयचा हा दलाल तेच बोलत होता, जे जयराम रमेश बोलत होते. जयराम रमेश तेच बोलत होते, जे राहुल गांधीना हवे होते. राहुल गांधी तेच बोलतात, जे पाकिस्तानच्या सोयीचे असते. असे हे वर्तुळ आहे. आयएसआयच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दलालांचे थोबाड तेव्हा फुटले जेव्हा कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्ने यांनी मोदींना फोन केला. जी-७ परीषदेचे निमंत्रण दिले.
बरं हे निमंत्रण दिले म्हणून मोदी मोठे होतात, किंवा मोदींना प्रभावी असल्याचे प्रमाणपत्र मिळते असाही प्रकार नाही. मुळात भारत या जी-७ गटाचा सदस्य नाही. तरीही भारताला निमंत्रण दिले जाते कारण या गटाची उपयुक्तता सिद्ध कऱण्याच्या दृष्टीने ते गरजेचे आहे. इच्छा असो वा नसो, भारताकडे दुर्लक्ष करून जग चालू शकत नाही. भारत ही जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. १४० कोटींचा देश आहे. जगातील सर्वाधिक मध्यमवर्ग असलेला देश आहे. सगळ्या मोठा मध्यमवर्ग म्हणजे सर्वाधिक क्रय शक्ती. ही अशा बाजारपेठ आहे, जिच्याकडे पाठ फिरवून अर्थकारणाचा बाजार उठवणे कोणालाही परवडणार नाही. मुद्दा आता फक्त बाजारपेठेपुरता मर्यादित राहिलेला नाही. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत ही लष्करी महासत्ता म्हणून उदयाला येत आहे. भारत ही अवकाश क्षेत्रातील महाशक्ती आहे. सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात भारताची ताकद जगाला ठाऊक आहे.
काँग्रेसच्या काळातील बोटचेपेपणा मोडीत काढून भारताने राष्ट्रप्रथम ही नीती वापरून वाटचाल सुरू केली आहे. यामुळे कदाचित भारताला एकटे पाडण्याचा विचार होऊ शकतो. परंतु तो प्रत्यक्षात आणणे कठीण आहे. डळमळीत अर्थव्यवस्था असलेल्या युरोपला, अमेरिकेला भारताची तेवढीच गरज आहे, जेवढी भारताची त्यांना आहे.
भारताची ही गेल्या दहा वर्षात निर्माण झालेली चमक आहे, ती काँग्रेसला खटकते आहे. मोदींच्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न काँग्रेसचे नेते वारंवार करतायत. भारतीय अभियांत्रिकीचे श्रेष्ठ उदाहरण असलेल्या चिनाब नदीवरील पुलाचे श्रेय याच जयराम रमेश याने काँग्रेसच्या पदरात टाकण्याचा प्रयत्न केला. जम्मू ते श्रीनगर हे १६ तासांचे अंतर केवळ चार तासांत कापणे या पूलामुळे शक्य होणार आहे. लष्कराच्या एओसी आणि एलएसीवर हालचाली प्रचंड वेगाने होणार आहेत. आय़फेल टॉवर पेक्षा उंच, ८ रिस्टर स्केलचा भूकंप झेलण्याची क्षमता असलेला हा पूल जगातील सगळ्या उंच पूल आहे. १४.८६ अब्ज रुपये खर्चून हा ३५९ मीटर उंचीचा पूल बनण्यात आला आहे. या पूलावरून पहिली कटरा-श्रीनगर वंदेभारत धावली. जयराम रमेश यांनी लगेच यांनी श्रेय घेऊन टाकले. डॉ.मनमोहन सिंह यांनी या रेल्वे मार्गाची सुरूवात केली होती, असे ट्वीट करून टाकले. पाठोपाठ आलेल्या सरकारांनी ठेवलेले कामांतील सातत्य यामुळे हे शक्य झाले आहे. परंतु मोदी ते मान्य करणार नाही. असे ते म्हणाले.
काँग्रेसवाल्यांच्या दृष्टीने शुभारंभाचा नारळ वाढवणे हीच अनेक प्रकल्पांबाबत कामाची सुरूवात असते. पुढे वर्षानुवर्षे कामच सुरू होत नाही. नारळ वाढवण्याचा फायदा पुढे श्रेय घेण्यासाठी होतो हे काँग्रेसवाल्यांना चांगलेच ठाऊक आहे. जयराम रमेश यांच्या विधानातील हवा काढली जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी. मी शाळेत असल्यापासून या रेल्वे मार्गाच्या कामाची चर्चा ऐकतोय. आज माझी मुले कॉलेजमध्ये आहेत, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे हा रेल्वे मार्ग सुरू झाल्याचे पाहायला मिळते आहे. ओमर अब्दुल्ला हे भाजपचे समर्थक नाहीत. ते मोदींचे कौतुक करतायत. मेहबुबा मुफ्ती मोदींची प्रशंसा करतायत.
हा चिनाब पूल ही केवळ भारताची शान नाही, पाकिस्तानची पोटदुखी सुद्धा आहे. कारण सामरीक दृष्ट्या या पुलाचे महत्व मोठे आहे. त्यामुळे पाकिस्तानी नेत्यांची झोप उडवणारे हे काम आहे. त्यामुळे काँग्रेस आणि पाकिस्तान दोघांना हा पूल सलणे स्वाभाविक आहे.
काँग्रेसच्या मोदी विरोधी प्रपोगंडाची एका आठवड्यात दोनदा विकेट गेलेली आहे. एकदा ती काढण्याचे काम केले, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्ने यांनी दुसऱ्यांदा केले ओमर अब्दुल्ला यांनी. काँग्रेसच्या रिकाम्या मडक्यांची निर्मिती असलेल्या पाकिस्तान पुरक कंटेटचा वासाही या पक्षाप्रमाणे पोकळ आहे.
