प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत सांगितले की, गेल्या ११ वर्षांत मोदींनी केवळ देशाच्या विकासासाठी नवे मार्ग तयार केले नाहीत, तर लोकांच्या विचारसरणीतही सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. मोदी सरकारने देशाला देशभक्ती आणि आत्मविश्वासाने भरले आहे, असं घई म्हणाले. सुभाष घई यांनी त्यांच्या चित्रपट ‘कांची’चा उल्लेख करत सांगितले की, ११ वर्षांपूर्वी त्यांनी हा चित्रपट तयार केला होता, ज्यामध्ये एक गाणं होतं, “सारे जहां से अच्छा, वो हिंदुस्तान कहां है”. त्या काळी देशात निराशेचं वातावरण होतं. पण २०१४ मध्ये मोदी सरकार आल्यानंतर बदलाची आशा निर्माण झाली.
घई म्हणाले, “पंतप्रधान मोदींना फक्त देशाचा विकास करायचा नाही, तर लोकांच्या विचारसरणीत बदल करायचा आहे. ते राष्ट्राला अधिक बळकट बनवू इच्छितात, आणि मला हे खूप आवडलं. त्यांनी नमूद केले की, गेल्या ११ वर्षांत पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, संरक्षण आणि शिक्षण अशा क्षेत्रांत प्रगती झाली आहे. सरकारचा दृष्टीकोन २०४७ पर्यंतचा आहे, जो दीर्घकालीन आणि मजबूत आहे.
हेही वाचा..
बिहार निवडणुकीत राहुल गांधींना पराभव दिसतोय
हिंदूंना गायी आणि बकऱ्यांप्रमाणे मारण्याची धमकी देणाऱ्या सनिउर रहमानला अटक!
श्रिया पिळगांवकरने ‘छल कपट’मध्ये कशी साकारली इन्स्पेक्टरची भूमिका?
सीसीपीएचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्वयं-लेखा परीक्षणाचे निर्देश
घई म्हणाले, “आज आपला देश देशभक्तीने परिपूर्ण आहे. कोणताही शत्रू आपल्याला आव्हान देऊ शकत नाही. आपल्या शिक्षण प्रणालीत आणि मुलांच्या विचारसरणीत बदल झाला आहे. आज आपला देश आंतरराष्ट्रीय पातळीवर शीर्षस्थानी पोहोचण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. घईंनी आठवण करून दिली की, १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्याच्या वेळी भारताला गरीब देश समजलं जात होतं, पण आता परिस्थिती बदलली आहे. ते म्हणाले, “पूर्वी विदेशांत आम्हाला गरीब देशाच्या नागरिक म्हणून पाहात, पण आता आपल्याला सन्मान मिळतो. लोक आपल्याला फक्त ग्राहक नव्हे, तर उत्पादक म्हणून पाहतात.”
घईंनी या प्रगतीसाठी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारचं अभिनंदन केलं. त्यांनी सांगितलं, “मोदी सरकारच्या कामगिरीची दखल घेण्याजोगी स्तुती करावी लागेल. देश आता सुरक्षित आणि मजबूत आहे, नागरिकांमध्ये आत्मविश्वास आणि देशभक्तीची भावना वाढली आहे. हा बदल केवळ पायाभूत सुविधांपुरताच मर्यादित नाही, तर लोकांच्या विचारसरणीतही झाला आहे. हा देशाच्या भविष्याकरिता एक मजबूत पाया आहे.”
