उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून पाच जणांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याची बाब उघडकी आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोन जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. इतर आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आपल्या मुलासह एक वर्षापूर्वी घरातून निघून गेली होती. त्यानंतर तिची ओळख आकाश नावाच्या एका तरुणाशी झाली आणि त्याने तिच्याशी लग्न केले. पण काही दिवसांतचं पीडितेच्या लक्षात आले की, आकाशने तिची फसवणूक केली आहे. आकाश याने महिलेला त्याचे खोटे नाव असलेले बनावट आधार कार्ड दाखवले होते. मात्र, त्याचे खरे नाव नौशाद आहे. त्याची खरी ओळख कळताच आणि फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तिला धमकावून एका घरात डांबून ठेवले.
पुढे नौशादने त्याच्या चार मित्रांसह मिळून तिच्यावर वर्षभर सामूहिक बलात्कार केला. रोज तिच्यावर अत्याचार होत होते. या काळात अनेक वेळा तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण ती अयशस्वी ठरली. अखेर एक दिवस संधी मिळताच पीडिता आरोपींच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी झाली. तिने तात्काळ आपल्या आईला फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर, पीडितेने आपल्या आईसह पोलीस स्टेशन गाठले आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.
हे ही वाचा:
‘जीएसटी बचत उत्सवा’नंतर काय होणार महाग आणि काय होणार स्वस्त?
११ वर्षांपासून भारतात रहिवास करणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना अटक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘जीएसटी बचत उत्सवाची घोषणा’
नोएडा विमानतळावरून लवकरच कमर्शियल उड्डाणे
पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला असून, आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. लवकरच त्यांनाही अटक केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पीडितेच्या आईने म्हटले की, “एक वर्षापूर्वी आमची मुलगी आपल्या मुलासह घरातून निघून गेली होती. आम्ही खूप शोध घेतला, पण ती सापडली नाही. काही दिवसांपूर्वी तिने फोन करून सांगितले की, आकाश नावाच्या तरुणाने खोटे आधार कार्ड वापरून तिच्याशी लग्न केले. त्यानंतर त्याने तिला डांबून चार मित्रांसोबत मिळून सामूहिक बलात्कार केला. आम्हाला आमच्या मुलीसाठी न्याय हवा आहे.”







