32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरक्राईमनामानवाब मलिकांचा जावई समीर खान तुरुंगातून बाहेर

नवाब मलिकांचा जावई समीर खान तुरुंगातून बाहेर

Google News Follow

Related

मुंबईतील विशेष न्यायालयाने सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान आणि इतर दोघांना अमली पदार्थांच्या प्रकरणात जामीन मंजूर केला. अमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपाखाली नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) या वर्षी १३ जानेवारीला खानला अटक केली होती.

त्यांचे वकील तारक सय्यद म्हणाले की, खान यांना ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. विशेष एनडीपीएस (नारकोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सब्स्टन्स ऍक्ट) न्यायालयाने सेलिब्रिटी मॅनेजर रहेला फर्निचरवाला आणि यूकेचा नागरिक करण सेजनानी यांना ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

एनसीबीने केलेल्या दाव्यानुसार, आरोपींने १९४.६ किलो गांजा खरेदी, विक्री, खरेदी आणि वाहतूक करण्याचा कट रचला होता. खान आणि इतर पाच जणांवर औषधाचे व्यावसायिक प्रमाण हाताळल्याचा आरोप होता. ज्यामध्ये जास्तीत जास्त २० वर्षांची शिक्षा आहे. एनसीबीने करण सजनानी या ब्रिटीश अनिवासी भारतीयासह राहिला व शाईस्ता फर्निचरवाला, या दलाल बहिणींना अटक केली होती. या तिघांकडेही गांजासह अन्य अमली पदार्थ सापडले होते. त्याखेरीज करण सजनानी हा अमेरिका व लंडनहून अमली पदार्थांच्या तस्करीतदेखील सहभागी असल्याचे तपासात समोर आले होते.

हे ही वाचा:

शिक्षण विभागातील १० पैकी ९ अधिकारी मुस्लिम

सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात गेलेले परब बाहेर आले संध्याकाळी

कांजूरमार्गसाठी २ लाख ट्रक माती आणली तर उडणार वाहतुकीची धूळधाण

महाराष्ट्रातील मोफत शिवभोजन थाळी झाली बंद; आता मोजा इतके पैसे

 

एनसीबीने आरोपपत्र दाखल केल्यानंतर जुलैमध्ये दाखल केलेल्या जामीन याचिकेत खानने फॉरेन्सिक प्रयोगशाळेच्या अहवालाचा संदर्भ दिला ज्यात म्हटले आहे की त्याला पाठवलेल्या १८ पैकी ११ नमुने गांजा असल्याचे निश्चित झाले नाहीत. जामीन अर्जात म्हटले आहे की, फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे तक्रारदारावर फक्त अत्यंत कमी प्रमाणात गांजा बाळगल्याचा आरोप केला जातो, ज्यासाठी जास्तीत जास्त शिक्षा एक वर्षाचा कारावास आहे.

एनसीबीने दावा केला की बहुतेक औषधे सेजनानीकडून जप्त करण्यात आली होती, जो खानसोबत ड्रग व्यवहारात गुंतला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा