छत्तीसगडमधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नक्षलग्रस्त भागात असलेला सुरक्षा दलांचा वाढता दबाव आणि सतत सुरू असलेल्या नक्षलविरोधी कारवाया लक्षात घेऊन कुख्यात महिला नक्षलवादी सुजाता हिने आत्मसमर्पण केले आहे. सुजाता हिच्या डोक्यावर एक कोटींचे बक्षीस होते. त्यामुळे सुजाता हिचे आत्मसमर्पण म्हणजे नक्षल मोहिमेसाठी मोठा धक्का मानला जात आहे, तर सुरक्षा दलाचे यश म्हणून याकडे पाहिले जात आहे.
बस्तर विभागात नक्षलवाद्यांविरुद्ध चालवल्या जाणाऱ्या मोहिमेदरम्यान सुजाताच्या आत्मसमर्पणामुळे माओवादी संघटनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सुजाता ही अनेक वर्षांपासून दक्षिण बस्तरमध्ये सक्रिय होती आणि नक्षलवाद्यांची दक्षिण उपक्षेत्र ब्युरो इन्चार्ज होती. सुजातावर एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. अशातच नक्षलवादी सुजाता हिने तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. सुजाता ही काही वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या कुख्यात नक्षलवादी कमांडर किशनजीची पत्नी आहे. आत्मसमर्पण करणारी सुजाता स्वतः सीसी सदस्य आहे आणि अनेक राज्यांमध्ये तिच्यावर लाखोंचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
ट्रम्प म्हणतात, रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर शुल्क लादणे सोपे काम नाही
माहितीनुसार, सुजाता ही छत्तीसगडच्या बस्तर विभागात बऱ्याच काळापासून सक्रिय आहे आणि मोठ्या हल्ल्यांचा कट रचण्यात सहभागी आहे. छत्तीसगडमधून नक्षलवाद संपवण्याच्या मोहिमेत सुजाताच्या आत्मसमर्पणाला मोठे यश मानले जात आहे. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांकडून नक्षलविरोधी कारवाया सातत्याने राबवल्या जात आहेत. यावेळी पावसाळ्यातही ही कारवाई केली जात आहे आणि चकमकीत अव्वल माओवादी सतत मारले जात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद्यांचा खात्मा करण्याची घोषणा केली आहे.







