तामिळनाडूमध्ये इसिस मॉड्यूल प्रकरणी १६ ठिकाणी एनआयएकडून छापेमारी

कोईम्बतूरमधील २०२२ मध्ये झालेल्या मंदिराबाहेरील स्फोटाप्रकरणी एनआयएकडून कारवाई

तामिळनाडूमध्ये इसिस मॉड्यूल प्रकरणी १६ ठिकाणी एनआयएकडून छापेमारी

राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएकडून तामिळनाडूमध्ये इस्लामिक स्टेट मॉड्यूलवर (इसिस) कारवाई करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणात १६ ठिकाणी एनआयएकडून छापेमारी सुरू असल्याची माहिती, एएनआयने मंगळवारी दिली आहे. एनआयए या प्रकरणाचा तपास एका वर्षाहून अधिक काळ करत आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, एनआयएने इसिस कट्टरता आणि भरती प्रकरणात चार जणांवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात अधिकचे पुरावे गोळा करण्यासाठी म्हणून एनआयएने ही छापेमारी सुरू केली आहे.

कोईम्बतूर येथे २०२२ मध्ये मंदिर कार बॉम्बस्फोटाशी संबंधित चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. जमील बाशा, मोहम्मद हुसेन, इरशाथ आणि सय्यद अब्दुर रहमान अशी या चार आरोपींची नावे आहेत. कोईम्बतूर कार बॉम्बस्फोट प्रकरणातील तपास आणि निष्कर्षांच्या आधारे एनआयएने ही कारवाई केली. कोईम्बतूर येथील प्राचीन मंदिराबाहेर बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासात असे दिसून आले की, यांचा दहशतवादी कारवायांसाठी इसिसमध्ये तरुणांची भरती करण्यात त्यांचा सहभाग होता.

हे ही वाचा : 

विलो चीपमुळे क्रांती घडणार!

सैफ हल्ला प्रकरणी पश्चिम बंगालमधून एका महिलेला अटक!

पंजाबमध्ये आंबेडकर पुतळा तोडफोड प्रकरण: या अपमानाला केजरीवाल जबाबदार!

महाकुंभ: गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री योगींनी केले संगमात स्नान!

इसिस कट्टरतावाद आणि भरती नेटवर्कसाठी कोईम्बतूर येथे मद्रास अरेबिक कॉलेज नावाचे अरबी भाषा केंद्र कार्यरत होते, ज्याचे नंतर कोवई अरेबिक कॉलेज असे नामकरण करण्यात आले. मोहम्मद हुसेन आणि इरशाथ यांनी कोईम्बतूर येथे केंद्राची स्थापना केली. ते सोशल मीडियावर आणि वर्गातील सत्रादरम्यान तरुणांवर प्रभाव टाकत असत. २०२२ मध्ये कोईम्बतूर येथे झालेला IED स्फोट मृत आरोपी जमेशा मुबीन याने घडवून आणला होता. जो इसिसशी सलंग्न होता. आरोपी सय्यद अब्दुर रहमानच्या नेतृत्वाखालील आयएसआयएसच्या भारतविरोधी मोहिमेचा एक भाग म्हणून त्याने बॉम्बस्फोटाची योजना राबवली होती.

Exit mobile version