अभिनेता सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी पश्चिम बंगालमधून एका महिलेला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी सोमवारी (२७ जानेवारी) पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात शोध मोहीम राबवत महिलेला अटक केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकाने वापरलेले सिम महिलेच्या नावावर नोंदणीकृत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
मुंबई पोलिसांचे दोन सदस्यीय पथक रविवारी पश्चिम बंगालमध्ये पोहोचले. पश्चिम बंगाल पोलिसांच्या एका सूत्राने सांगितले की, ‘मुंबई पोलिसांनी सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी नादिया जिल्ह्यातील छपरा येथून एका महिलेला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेला मुंबईला नेण्यासाठी पोलीस ट्रान्झिट रिमांडसाठी अर्ज करू शकतात.
हे ही वाचा :
चेन्नईच्या किनारपट्टीवर १००० ऑलिव्ह रिडले कासव मृतावस्थेत !
पंजाबमध्ये आंबेडकर पुतळा तोडफोड प्रकरण: या अपमानाला केजरीवाल जबाबदार!
जेपीसीकडून वक्फ विधेयकातील १४ सूचनांना मान्यता; विरोधकांच्या सर्व दुरुस्त्या फेटाळल्या
दिल्लीकरांचे संपूर्ण कुटुंबच केजरीवाल सरकार चालवणार; जाहीरनाम्यात १५ गॅरंटी
खुखुमोनी जहांगीर शेख असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून आरोपी शरीफुल फकीरची ओळखीची आहे. सूत्राने सांगितले की, ‘आरोपी शरीफुल फकीर सिलीगुडीजवळील भारत-बांगलादेश सीमेवरून बेकायदेशीरपणे भारतात घुसला होता आणि या महिलेच्या संपर्कात आला होता. ही महिला पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील अंदुलिया येथील रहिवासी आहे. दरम्यान, या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून अधिक तपास सुरु असून नव्या माहितीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.