29 C
Mumbai
Thursday, October 29, 2026
घरक्राईमनामानिर्भया पथकाकडून ३०० मुलांची सुखरूप घरवापसी!

निर्भया पथकाकडून ३०० मुलांची सुखरूप घरवापसी!

Google News Follow

लोहमार्ग पोलिसांच्या निर्भया पथकाचे यश

जून महिन्या मध्ये पोलीस महिला कर्मचाऱ्यांच्या निर्भया पथकाकडून अल्पवयीन ३०० मुला-मुलींची घरवापसी करण्यात आली आहे. यामध्ये घरातून पळून आलेल्या आणि रेल्वे हद्दीत सापडलेल्या मुलांची लोहमार्ग पोलिसांच्या निर्भया पथकाकडून सुखरूपपणे घरी पोहोचवण्यात यश आले आहे. तीन अपहरण प्रकरणातील आरोपींना पकडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अभ्यासक्रमाचा ताण, घरातील कुटुंबीयांबरोबर झालेले वाद, रेल्वे स्थानक तसेच शहर पाहण्याची ओढ, चित्रपट अभिनेत्यांच्या भेटीसाठी प्रयत्न अशा अनेक विविध कारणांमुळे अल्पवयीन मुलं घरातून पलायन करतात. ह्या मध्ये काही मुलांचा पोलिसांमार्फत शोध घेतला जातो. तर काही अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यांची विक्री केली जाते.

हे ही वाचा:

‘मोफत रेवडी वाटून मते गोळा करणारी संस्कृती देशासाठी घातक’

गुलामीच्या पाऊलखुणा पुसण्यासाठी नामांतराचा निर्णय

अतिवृष्टीमुळे रद्द झालेल्या परीक्षा होणार; मुंबई विद्यापीठाचा निर्णय

विरोधी पक्षनेत्यांना विरोध करायचाच असतो, पण निर्णय थांबलेले नाहीत!

पश्चिम रेल्वे व मध्य रेल्वे उपनगरीय स्थानकात अशी अल्पवयीन मुले सापडण्याचे प्रमाण अधिक आहे. अशा प्रकाराची माहिती मिळताच अथवा संशयित वाटल्यास पोलीस त्या मुलांना ताब्यात घेतात व सामाजिक संस्थेच्या मदतीने आवश्यक ती कारवाई करून, कुटुंबाचा शोध घेऊन मुलांना पालकांच्या स्वाधीन करण्यात येते.

लोहमार्ग पोलिसांच्या महिला कर्मचाऱ्यांच्या “निर्भया” पथकाने ३०० अल्पवयीन मुलांना सुखरूप घरी पाठवण्यात यश आले आहे. त्यामध्ये १३४ मुलांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले असून उर्वरित १६३ मुलांना बाल सुधारगृह आणि मुलींना महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा