भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत फटाके आणि रॉकेट उडविणाऱ्यावर एक महिन्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी शनिवारी हा आदेश जारी केला आहे.११ मे ते ९ जून २०२५ पर्यत ही बंदी असणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
भारत पाकिस्तान सीमेवर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मुंबईत ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आलेली आहे,चेकपोस्ट, रेल्वे स्थानके,धार्मिक स्थळावर तपासणी सुरू आहेत. सद्या या महिन्यात बलग्नसराईचे दिवस सुरू आहे ,विवाह सोहळ्यात आतिषबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्यामुळे युद्धाच्या काळात मुंबईत फटाके उडवणे, रॉकेट उडवणे, आतिषबाजी यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.
हे ही वाचा:
मला अभिमान आहे, वडिलांच्या मृत्यूचा बदला घेईन!
पंतप्रधान मोदींनी ठणकावले; आता पाकिस्तानशी चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरवरच!
पुलवामाच्या हत्याकांडात सहभाग असल्याची पाकचीच कबुली!
शनिवारी मुंबई पोलिसांनी काढलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, ११ मे ते ९ जून २०२५ या कालावधीत मुंबईत फटाके आणि रॉकेट उडविणार्यावर बंदी घालण्यात येत आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील असे सांगण्यात आले आहे.







