34 C
Mumbai
Friday, December 5, 2025
घरक्राईमनामाबापरे! घाटकोपर- मानखुर्द उड्डाणपुलावर पहिल्याच दिवशी मृत्यू

बापरे! घाटकोपर- मानखुर्द उड्डाणपुलावर पहिल्याच दिवशी मृत्यू

Google News Follow

Related

महिन्याभरापूर्वी खुल्या करण्यात आलेल्या घाटकोपर- मानखुर्द उड्डाणपुलावर अनेक अपघात होत असून हा पूल आता मृत्यूचा सापळा बनत आहे. पुलावरील रस्ता पावसात अत्यंत निसरडा बनत असल्यामुळे पहिल्या दिवसापासूनच पुलावर अपघात होण्यास सुरुवात झाली आहे. अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचा समावेश अधिक आहे. वाढती अपघात संख्या पाहता हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी धोकादायक आहे, अशी भीती वाहन चालकांच्या मनात निर्माण झाली आहे.

पुलांवर होणाऱ्या अपघातांमध्ये अनेक जणांना आपला जीवही गमवावा लागत आहे. सोमवारी या रस्त्यावर तेल पसरल्यामुळे अनेक दुचाकींचे अपघात झाले. या अपघातांमध्ये मोहम्मद युसूफ खान या दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागला. काही दिवसांपूर्वी आरिफ साहा याच्या दुचाकीला एका गाडीने धडक दिल्यामुळे तो थेट उड्डाणपुलावरून खाली कोसळला आणि त्याला आपला जीव गमवावा लागला. रस्त्याच्या दर्जाबद्दलही वाहनचालक प्रश्न उपस्थित करत आहेत.

हे ही वाचा:

काश्मीरही काफ़िरांपासून ‘मुक्त’ करा

गौतम अदानींच्या संपत्तीत वाढ

टेस्लाची ‘ही’ चार मॉडेल्स भारतात

२५ भारतीय आयएसआयएसमध्ये सामील

उड्डाणपुलावर बेदकारपणे वाहन चालवण्याचे प्रमाण वाढले आहे. रस्ता गुळगुळीत असल्यामुळे अपघात होतात. रस्त्याबद्दल अभियंत्यांना तक्रार केली असून काही उपायही सुचवले आहेत. या पुलावर सीसीटीव्ही, वाहनाचा वेग तपासण्याचे यंत्र, रंबलर्स आणि स्थानिक पोलीस असणे आवश्यक आहे. तेसेच या पुलावर ५० ची वेगमर्यादा पाळणे आवश्यक आहे, असे मानखुर्द वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले.

पावसात अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन हा पूल वाहतुकीसाठी बंद करतात. मंगळवारीही पाऊस सुरू झाल्यावर दोन तास हा पूल बंद ठेवल्याने वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केली. उड्डाणपूल वाह्तुकीसाठी बंद ठेवणे हा उपाय नसून, असे हे किती दिवस चालणार, हा प्रश्न चालकांना पडत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा