29.9 C
Mumbai
Wednesday, May 20, 2026
घरक्राईमनामाअमित शाहांच्या निधनाची खोटी पोस्ट करणाऱ्याला ठोकल्या बेड्या

अमित शाहांच्या निधनाची खोटी पोस्ट करणाऱ्याला ठोकल्या बेड्या

गाझियाबाद पोलिसांनी केली अटक

Google News Follow

Related

देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल खोटी माहिती पसरवणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये ही कारवाई करण्यात आली असून गाझियाबाद पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अमित शाह यांचे निधन झाल्याची फेक न्यूज पोस्ट करण्यात आली होती. रोहित (वय ३४ वर्षे) असे त्या व्यक्तीचे नाव आहे.

बुधवारी उत्तर प्रदेशमध्ये गाझियाबाद पोलिसांनी कारवाई केली आहे. रोहित (वय ३४) असे पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. उत्तर प्रदेशातील मोरादाबाद जिल्ह्याचे भाजपचे पदाधिकारी अनिल शर्मा यांनी या फेक न्यूजबद्दलची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अनिल शर्मा यांनी फेसबुकवर अमित शाह यांच्या निधनाची खोटी पोस्ट बघितली. भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमान्वये आरोपी रोहित विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त स्वतंत्र कुमार सिंह यांनी दिली.

हे ही वाचा : 

वीर बाल दिनी १७ शूर मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार

काँग्रेसच्या कार्यक्रमात भारताच्या नकाशातून पीओके, अक्साई चीन गायब

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची गाडी उलटून झालेल्या अपघातात महाराष्ट्रातील दोन जवान!

कल्याण:अल्पवयीन मुलीवर अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी!

पोलिसांनी आरोपी रोहितला अटक करून चौकशी केली. त्याने गुन्ह्याची कबूली देताना असे करण्याचे कारणही सांगितले. त्याचे सोशल मीडियावरील फॉलोअर्स वाढवण्यासाठी अमित शाहांबद्दलची फेक न्यूज पोस्ट केली होती. सिंह यांनी सांगितले की, इंदिरापुरम पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोपीचे ठिकाण शोधले. त्यानंतर वसुंधरा कॉलनीमधील हिंडन नदीच्या पुलाजवळ त्याला अटक केली.

दरम्यान, एका आंदोलनाचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात आंदोलक हे अमित शाह यांचा फोटो लावलेल्या बॅनरवर लघवी करत आहेत. यानंतर संताप व्यक्त केला जात असून यावर कारवाई केली जावी, अशी मागणी केली जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
307,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा