26 C
Mumbai
Wednesday, December 10, 2025
घरक्राईमनामाजालन्यात ६५ वर्षीय शेजाऱ्यानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

जालन्यात ६५ वर्षीय शेजाऱ्यानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Google News Follow

Related

महाराष्ट्रात बलात्काराच्या घटनांची मालिका थांबण्याचे चिन्ह नाही. पुणे, मुंबई, उल्हासनगर, अमरावतीनंतर आता जालन्यातही अशाच बलात्काराची संतापजनक घटना घडली आहे. विशेष म्हणजे या घटनांत अल्पवयीन मुली शिकार झाल्याचे दिसते आहे.

जालना जिल्हा देखील बलात्काराच्या घटनेने हादरला आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात केवळ १२ वर्षांच्या मुलीवर शेजाऱ्यानेच पाशवी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या बलात्काऱ्याचे वय ६५ आहे. त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पण या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

बदनापूर तालुक्यातील एका गावात मंगळवारी दुपारी पीडित मुलगी घरासमोर कोंबड्यांना दाणे टाकत होती.  तिच्या घरात कुणीही नव्हते. याचा फायदा उठवत बाजूच्या शेतात राहणाऱ्या आरोपी अनवर खान याने मुलीला जबरदस्ती आपल्या घरात नेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीने आपल्या आईला ही हकीकत सांगितल्यानंतर मुलीच्या आईने बदनापूर पोलीस ठाण्यात सदर माणसाविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे ही वाचा:

दहशतवाद्यांना अटक हा गंभीर मुद्दा, यांना वेळीच संपवायला हवं

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा समर्पण पर्व

शेतकरी आंदोलनामुळे किती नुकसान झाले?

टेलिकॉम क्षेत्रात आता करता येणार १००% परकीय गुंतवणूक

अमरावतीत जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन अंतर्गत एका अल्पवयीन मुलीशी नराधमाने बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्तापित केल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. बदनामीच्या भीतीपोटी तिने स्वतः ला गळफास लावून संपवलं. पिंपरीत निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त असल्याचे सांगत एका नराधमाने शिक्षिकेवर बलात्कार केला.

पुण्यात आठ दिवसांपूर्वी एका १३ वर्षाच्या चिमुकलीवर १३ जणांनी सामूहिक बलात्कार केला होता.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा