30 C
Mumbai
Monday, November 16, 2026
घरक्राईमनामाकुलगाममध्ये चकमकीत एक दहशतवादी ठार

कुलगाममध्ये चकमकीत एक दहशतवादी ठार

लष्करचा कमांडर लतीफ भट जखमी अवस्थेत पसार झाल्याचा संशय

Google News Follow

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे सोमवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. तर लष्कर-ए-तोयबाचा (LeT) हवा असलेला कमांडर लतीफ भट हा जखमी अवस्थेत घटनास्थळावरून पळून गेल्याची शक्यता सुरक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. चकमकीनंतर घटनास्थळावरून एक मृतदेह आणि संशयित एके-सिरीज रायफल जप्त करण्यात आली. प्राथमिक ओळखीनुसार, ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव उमर असल्याचे समोर आले आहे. त्याच्याबाबत अधिक माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

गेल्या आठवड्यात कुलगाममधील सीआरपीएफच्या चौकीवर झालेल्या हल्ल्यात लतीफ भट सहभागी असल्याचा संशय आहे. तो लष्करचा स्थानिक कमांडर असल्याचे सांगितले जाते. सुरक्षा दल त्याचा शोध घेत असून परिसरात कडक वेढा घालण्यात आला आहे. चकमकीत दोन दहशतवादी अडकल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यापैकी एक ठार झाला असून दुसरा जखमी अवस्थेत निसटल्याची शक्यता आहे.

११ नोव्हेंबर रोजी दोन सशस्त्र दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या गस्ती पथकावर गोळीबार केला होता. या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले होते. त्यानंतर ग्रामीण कुलगाममध्ये सलग सहाव्या दिवशी दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. या मोहिमेत ड्रोन, श्वानपथक आणि मेटल डिटेक्टरचा वापर केला जात आहे. गावांच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली असून हालचालींवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

श्रीगंगानगर स्फोटप्रकरणी आणखी दोन बॉम्ब जप्त

कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी संपर्क नव्हता, तेव्हा अजितदादांचा फोन यायचा

घरबसल्या नोकरीच्या आमिषाने तरुणीला ९०.८ लाखांचा गंडा

आसियान, पूर्व आशिया शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी मनिलात दाखल

जम्मू-काश्मीर पोलिसांचा विशेष कृती गट (एसओजी), सीआरपीएफची १८ वी बटालियन आणि लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सचे जवान संयुक्तपणे ही कारवाई करत आहेत. सीआरपीएफवरील हल्ल्यामागील सूत्रधारांचा शोध घेऊन परिसर सुरक्षित होईपर्यंत मोहीम सुरूच राहणार असल्याचे वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा