26 C
Mumbai
Saturday, December 6, 2025
घरक्राईमनामापंकजा मुंडेंचा स्वीय सहाय्यक अनंत गर्जेला अटक

पंकजा मुंडेंचा स्वीय सहाय्यक अनंत गर्जेला अटक

वरळी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण

Google News Follow

Related

भाजप नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे याची पत्नी गौरी गर्जे यांनी शनिवारी रात्री वरळी बीडीडी चाळीच्या जागी झालेल्या इमारतीत राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादातून त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती वरळी पोलिसांनी दिली होती. गौरी यांच्या कुटुंबीयांनी देखील ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला.

गौरी गर्जे यांच्या आत्महत्येनंतर तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यानंतर मध्यरात्री वरळी पोलिसांनी गौरी यांचा पती आणि पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जेला अटक केली. गेल्या काही तासांपासून अनंत गर्जे हा फरार होता. अखेर रात्री १ वाजता गर्जे याने वरळी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

वरळी पोलिसांनी गौरी पालवे- गर्जे आत्महत्येप्रकरणी रविवारी भारतीय न्याय संहिता कलम १०८, ८५, ३५२ आणि ३५१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. अनंत गर्जे, त्याची बहीण शीतल गर्जे- आंधळे आणि दीर अजय गर्जे यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला. या तिघांवर त्रास देणे, अपमान करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

हे ही वाचा: 

“सिंध भारतात परत येऊ शकतो, सीमा बदलू शकतात”

दिल्लीत प्रदूषणाविरुद्धच्या आंदोलनात माओवादी कमांडर माडवी हिडमाचे पोस्टर्स

SIR योजनेमुळे पश्चिम बंगालमध्ये दोन भाऊ ३७ वर्षांनी भेटले!

स्मृती मंधानाचा विवाह सोहळा स्थगित, वडिलांची तब्येत बिघडली

माहितीनुसार, स्वतः अनंत गर्जे हा गौरी गर्जे यांना रूग्णालयात घेऊन गेला होता. यादरम्यान त्याने तिच्या आई- वडिलांना, पंकजा मुंडेंच्या दुसऱ्या एका पीएला फोन करून गौरी यांच्या आत्महत्येबद्दल सांगितले होते. दरम्यान, गौरी गर्जे हिच्या कुटुंबियांकडून अनेक गंभीर आरोप अनंत गर्जे आणि त्याच्या बहीण- भावावर करण्यात आले आहेत. किरण इंगळे नावाच्या महिलेसोबत अनंतचे संबंध होते आणि याची कल्पना गौरी यांना आली. यावरून दोघांमध्ये प्रचंड वाद सुरू होता. हेच नाही तर गौरी यांनी त्याला माफही केले होते. मात्र, तो चॅटिंग करत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्या त्रासात होत्या. हेच नाही तर गर्भपाताचा एक रिपोर्टही गौरी यांच्या हाती लागला होता. ज्यामध्ये अनंत गर्जेचे नाव होते. गौरी यांनी या सर्व गोष्टींची कल्पना आपल्या कुटुंबियांना दिली. अनंतने गौरी यांना अनेकदा मारहाण केल्याचेही समोर आले होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा