25 C
Mumbai
Saturday, February 7, 2026
घरक्राईमनामाविना हेल्मेट प्रवास करताय? हजार रुपये दंड भरा

विना हेल्मेट प्रवास करताय? हजार रुपये दंड भरा

Google News Follow

Related

वाहनचालकांसाठी महत्त्वाचे नियम लागू झाले आहेत. नियम मोडून प्रवास करणारे अनेक वाहनचालक आपल्याला बघायला मिळतात. परंतु आता त्यांच्यावर चाप लावण्यासाठी नवे नियम आणलेले आहेत. कारण हेल्मेट किंवा सीटबेल्ट नसेल तर त्यांना एक हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. पुढील आठवड्यापासून या नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने हे बदल करण्यात आले आहेत. विनाहेल्मेट आढळणाऱ्या दुचाकीस्वारांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्दही केला जाणार आहे. या नवीन नियमांबाबतची नोटीस सोमवारी जरी करण्यात येणार आहे.

द इंडियन एक्प्रेसने दिलेल्या बातमुनीसार, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटर वाहन अधिनियम कायदा २०१९ अंतर्गत सोमवारपासून कारवाई करण्यात येणार आहे. मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्यांवर, न्यायालयीन कारवाईनंतर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. नवीन कायद्यानुसार पहिल्या गुन्ह्यासाठी ६ महिने तुरुंगवास आणि किंवा १० हजार रुपये दंड ठोठावला जाण्याची तरतूद आहे. तर दुसऱ्यांदा अशाच प्रकारचा गुन्हा केल्यास २ वर्षे तुरुंगवास आणि/किंवा १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. परंतु अजून याबाबतचे अधिकृत आदेश आलेले नाहीत.

हे ही वाचा:

भारताचा हा बॉम्ब का वाढवतोय चीन, पाकिस्तानची चिंता?

मोदी-पोप बैठकीत काय चर्चा होणार?

आर्यन खानची आता होणार सुटका

‘त्याच्या उत्पन्नातून एसटी चालवू शकतो एवढे त्याने कमावले आहे’

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सांगण्याप्रमाणे, परिवहन कायद्यांच्या काही नियमांच्या दंडामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. फॅन्सी नंबर प्लेट असल्यास वाहनचालकांनाही १ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास आकारण्यात येणाऱ्या सुधारित दंडाच्या अंमलबजावणीचा निर्णय वाहनचाकांना शिस्त लागावी, तसेच अपघात कमी करण्यासाठी लागू करण्यात येणार आहेत, असं परब यांनी सांगितलं आहे. फॅन्सी नंबर प्लेटसाठी, रिफ्लेक्टर, टेल लॅम्प नसल्यास, हेल्मेट नसल्यास तसेच सीटबेल्ट नसल्यास वाहन चालकांना हजार रुपये दंड तर वेगाने बाईक चालविल्यास, परमिटशिवाय वाहन चालविल्यास २ हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा